गणेशचतुर्थीनिमित्त खानापूर बाजारपेठेत प्रचंड गर्दी
04:12 PM Sep 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
खानापूर : खानापूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील लोक गणेश चतुर्थीच्या साहित्याच्या खरेदीसाठी आले होते. शिवस्मारकापासून ज्ञानेश्वर मंदिर, बेंद्रे खुट्ट ते पारिश्वाड रोड या ठिकाणी बाजार मोठ्या प्रमाणात भरला होता. गणपतीला सजावटीचे साहित्य, फुले, फळे, पूजेचे साहित्य, किराणा आणि कपडे खरेदीसाठी लोकांची एकच गर्दी झाली होती. संपूर्ण बाजार गर्दीने फुलून गेला होता. भररस्त्यावर फळविक्रेते, भाजीविक्रेते, नारळ, माटोळी साहित्य यासह फुगे विक्रेते, फूल, हारविक्रेते रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसल्यामुळे बाजारात तुडुंब गर्दी दिसत होती.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article