For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘झीरी’ उत्सवासाठी जम्मूत प्रचंड गर्दी

06:05 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘झीरी’ उत्सवासाठी जम्मूत प्रचंड गर्दी
Advertisement

जम्मू

Advertisement

जम्मूत इतिहासप्रसिद्ध ‘झीरी’ सामजिक उत्सवाला प्रारंभ झाला असून या उत्सवासाठी सहस्रावधी भाविकांनी उपस्थिती दर्शविली आहे. सोमवारपासून या महोत्सवास प्रारंभ झाला असून तो परंपरेप्रमाणे 10 दिवस चालणार आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा येथून आलेल्या भाविकांची संख्या सर्वाधिक असल्याचे उत्सव समितीने स्पष्ट केले. 500 वर्षांपूर्वी एका अत्याचारी जमीनदाराशी संघर्ष करताना बाबा जित्तो या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या स्मरणार्थ हा उत्सव दरवर्षी केला जातो. बाबा जित्तो यांच्या मृत्यूनंतर त्यांची कन्या कौरी हिने पित्याच्या चितेत उडी मारुन प्राणार्पण केले होते. बाबा जित्तो आणि त्यांची कन्या कौरी यांच्या स्मरणार्थ 500 वर्षांपूर्वी एक मंदीर स्थापन करण्यात आले आहे. या मंदिरात हा स्मृतीउत्सव दरवर्षी केला जातो. या मंदिराच्या परिसरात एक सरोवर असून या उत्सवाला आलेले भाविक या तलावात पवित्र स्नान करतात. या मंदिराचे मुख्य पुरोहित भुवनेश मेहता हे आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.