For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | महसूलमंत्री बावनकुळेंच्या 'जनसंवादा'त प्रचंड गोंधळ; तक्रारदारांची झुंबड, पोलिसांची धावपळ

03:41 PM Aug 24, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   महसूलमंत्री बावनकुळेंच्या  जनसंवादा त प्रचंड गोंधळ  तक्रारदारांची झुंबड  पोलिसांची धावपळ
Advertisement

को्ल्हापुर - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवार (दि. २३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जनसंवाद अर्थात जनता दरबाराची जय्यत तयारी केली होती. सकाळपासून तक्रारदारांनी जिल्हाधिकारी - कार्यालयात येण्यास सुरूवात केली. दुपारी तीनची वेळ अन् तक्रारदारांची लागलेली रांग. प्रत्यक्षात जनसंवाद पावणेपाचला सुरू झाला, अन् महसूलमंत्र्यांना अर्ज देण्यासाठी तक्रारदारांची झुंबड उडाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास गोंधळ आणि धक्काबुक्कीचेच चित्र पहायला मिळाले.
-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महसूल विभागाने निवेदने स्वीकारण्यासाठी चार दालने उभारली. तेथे तक्रारदारांचे निवेदन नोंद करून त्यांना टोकण दिले जात होते. टोकण घेण्यासाठीही मोठी रांग लागली. दुपारी ३ वाजता जनता दरबार होता, पण त्यापूर्वीच हा परिसर तक्रारदारांच्या गर्दीने फुलून गेला. यामध्ये महिला, दिव्यांगही होते. परगावच्या तक्रारदारांनी जनसंवाद म्हणून आयोजित दरबारात मांडलेल्यात्यात भाजपा कार्यकर्त्यांची संख्याही अधिक होती.

Advertisement

साडेचार वाजले तरी मंत्री बावनकुळे यांचे आगमन झाले नाही, परिणामी तक्रारदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. सायंकाळी पावणेपाच वाजता महसूलमंत्री बावनकुळेंचे जनसंवादस्थळी आगमन झाले आणि गोंधळ उडाला. टोकननुसार नावे पुकारली जात असतानाच मागे बसलेल्या तक्रारदारांनी पुढे येण्यास सुरूवात केली.

सर्वच तक्रारदार महसूलमंत्र्यांसमोर निवेदन घेऊन आल्याने गोंधळ उडाला. जनसंवाद व्यासपीठापासून १० फुटांवर जाड नायलॉन दोरी बांधली. ही दोरी पकडून साखळी करत पोलिसांनी गर्दीला आवर घातला. जनता दरबारात ३०० ते ३५० निवेदने येतील, अशी अपेक्षा होती. पण ती सव्वासातशे आली, अन् दरबार सुरू असतानाही त्यांची नोंदणी सुरू होती, यावरून महसूल विभागाचा अंदाज चुकल्याचीच प्रतिक्रिया होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.