For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बस चालकाकडून मोठी संपत्ती जप्त

06:22 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बस चालकाकडून मोठी संपत्ती जप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात एका माजी बसचालकाच्या घरावर पोलीसांनी टाकलेल्या धाडीत पोलिसांना 15 किलो सोने आणि 20 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रकम आढळून आली आहे. या चालकाचे नाव मीनार मोंडल  असे आहे. दगड व्यापार प्रकरणात या बस चालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी हे घबाड पोलिसांच्या हाती सापडले. ही रक्कम आणि सोने दगडांचा काळाबाजार करुन कमावलेली आहे, असा पोलिसांचा आरोप आहे. रोख रक्कम 35 पिशव्यांमध्ये साठविलेली होती. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी पोलिसांना पाच रोख रक्कम गणना यंत्रांचे साहाय्य घ्यावे लागले. आतापर्यंत या चालकाच्या घरात 15 किलो सोने सापडले आहे. अद्याप शोध घेतला जात आहे.

मीनार मोंडल याच्या घरी संपत्तीचा साठा लपविलेला आहे, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर धाड घातली. ही रक्कम आणि हा सोन्याचा साठा सरकारी संपत्तीचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांचे शोषण करुन मिळविला आहे, असा पोलिसांचा संशय असून मीनार मोंडल याच्या चौकशीतून आणखी बऱ्याच जणांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. मेंडल याने ही संपत्ती कशी आणि केव्हा गोळा केली, याची माहिती घेतली जात आहे. तसेच या प्रकरणात लोकांनी सत्तेतून घालवून दिलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा किंवा त्या पक्षाच्या नेत्यांचा संबंध आहे काय, याचीही चौकशी होईल अशी माहिती आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.