होळीनिमित्त हुबळी-मुजफ्फरपूर विशेष रेल्वे
06:45 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
होळीनिमित्त नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी ते मुजफ्फरपूर या दरम्यान रेल्वेची विशेष फेरी जाहीर केली आहे. यामुळे बेळगावसह इतर महत्त्वाच्या शहरांमधील प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे.
4 मार्च ते एप्रिल या दरम्यान प्रत्येक बुधवारी सायंकाळी 5.20 वाजता हुबळी येथून एक्स्प्रेस निघणार असून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात 7 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान प्रत्येक शनिवारी दुपारी 1.15 वाजता मुजफ्फरपूर येथून एक्स्प्रेस निघणार असून सोमवारी सकाळी 11.15 वाजता हुबळी येथे पोहोचणार आहे. या रेल्वेला धारवाड, बेळगाव, घटप्रभा, मिरज-सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. एकूण 23 डबे या एक्स्प्रेसला जोडण्यात आले आहेत.
Advertisement
Advertisement