हुबळी-मिरज पॅसेंजरचा वेग वाढविणार
06:43 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
हुबळी-मिरज रेल्वे क्रमांक 17332 या पॅसेंजर रेल्वेच्या वेळापत्रकात लवकरच बदल केला जाणार आहे. सध्या विद्युतीकरण करण्यात आल्याने या रेल्वेची गती वाढविली जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी एक तासाने कमी होणार आहे.
सकाळी 11.45 वा. हुबळी येथून निघालेली रेल्वे धारवाड, लोंढा मार्गे दुपारी 3.05 मिनिटांनी बेळगावला पोहोचेल. त्यानंतर घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, शेडबाळ, विजयनगर मार्गे सायंकाळी 6.30 वा. मिरज येथे पोहोचणार आहे. त्यामुळे या रेल्वेच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला जाणार आहे.
Advertisement
Advertisement