महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी जन्मभूमी, बेळगाव कर्मभूमी

10:36 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा दावा

Advertisement

बेळगाव : बेळगाव मला नवीन नाही. 30 वर्षांपासून माझे बेळगावशी संबंध आहेत. सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. हुबळी जन्मभूमी असली तरी बेळगाव माझी कर्मभूमी आहे, असे माजी मुख्यमंत्री, बेळगाव लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी भगवी शाल घालून प्रचार करत आहेत. मात्र, यामुळे तुमची मूळ भूमिका बदलणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. कोरोना काळात जिल्ह्यामध्ये आपण काम केले आहे. आपण निश्चित केलेल्या ठिकाणी सुवर्णसौध उभारण्यात आली आहे. आपण मुख्यमंत्री असताना सुवर्णसौधचे उद्घाटन करण्यात आले. पक्षात लहान-सहान समस्या असल्या तरी त्या निकालात काढल्या जातील. जिल्ह्यात संघटितपणे काम करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. जगदीश शेट्टर बाहेरचे आहेत, असे बोलले जात आहे. हुबळी माझी जन्मभूमी असली तरी बेळगाव माझी कर्मभूमी आहे. बेळगावमध्ये घर घेऊन वास्तव्य करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी धारवाड, दिंगालेश्वर स्वामीजी म्हणाले, शेट्टर यांना उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. येडियुराप्पा यांनी समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सर्वांनी संघटितपणे कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article