हुबळी-बेंगळूर नवी सुपरफास्ट रेल्वे 8 डिसेंबरपासून धावणार
बेंगळूर : केंद्र सरकारने कर्नाटकाला दिवाळी भेट दिली आहे. राज्याची राजधानी बेंगळूर ते हुबळी मार्गावर ‘सुपरफास्ट रेल्वे’ मंजूर केली आहे. सदर रेल्वे 8 डिसेंबरपासून दररोज धावणार आहेत. रेल्वे क्र. 20687 आणि 20688 या सुपरफास्ट रेल्वे बेंगळूर-हुबळी मार्गावर धावतील. यामुळे उत्तर कर्नाटकातील उद्योजक, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना अनुकूल होणार आहे. बेंगळूर आणि हुबळीशी अनेक जणांचा संपर्क असल्याने धारवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानुसार रेल्वेमंत्र्यांनी बेंगळूर-हुबळी दरम्यान सुपरफास्ट रेल्वे मंजूर केली आहे. 8 डिसेंबरपासून ही रेल्वे धावणार आहे. हुबळी, करजगी, हावेरी, राणेबेन्नूर, दावणगेरे, बिरुर, अरसीकेरे, संपीगे रोड, यशवंतपूर आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वेस्थानक बेंगळूर या मार्गावर धावणार आहे. यामुळे सात ते आठ जिल्ह्यांतील प्रवाशांना अधिक लाभ होणार आहे.