For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचएसआरपी : वाहनधारकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

06:22 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
एचएसआरपी   वाहनधारकांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
Advertisement

कारवाईसंबंधी आदेशाला 4 जुलैपर्यंत मुदतवाढ

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) लावण्याची सक्ती राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, 21 मे रोजी एचएसआरपी नंबरप्लेट न लावणाऱ्या वाहनधारकांवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याच्या दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने 4 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच, राज्य सरकार कठोर कारवाई करण्यासंबंधी मुदत वाढविण्यास मुक्त असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. अरविंद यांच्या खंडपीठाने बीएनडी एनर्जी लिमिटेड या एचएसपीसी उत्पादक कंपनीने दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी केली. या कंपनीने एचएसआरपीच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत 31 मे पर्यंत वाढवण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती केली.

Advertisement

सुनावणीवेळी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी, मागील सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशाची मुदत संपत असल्याने ही मुदत पुन्हा वाढवावी तसेच, मुदत वाढवण्याचा निर्णय खंडपीठाने घ्यावा, असा युक्तिवाद केला. राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल विक्रम हुईलगोळ यांनी, राज्य सरकार एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची अंतिम मुदत ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहे. आठवडाभरात यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल. उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास सरकार मुदत वाढविणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने 17 ऑगस्ट 2023 रोजी राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ‘ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर’ (ओईएम) च्या अधिकृत डीलर्समार्फत एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची अधिसूचना जारी केली होती.

Advertisement
Tags :

.