कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

HSC result 2025 Live : बारावीचा निकाल 91. 88 टक्के, कोकण अव्वल तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर

01:54 PM May 05, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

यंदा राज्याचा निकाल 91. 88 टक्के इतका लागला असून नेहमीप्रमाणे यामध्ये कोकण विभाग अव्वल स्थानावर

Advertisement

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून संबंधित संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध झाला. यंदा राज्याचा निकाल 91. 88 टक्के इतका लागला असून नेहमीप्रमाणे यामध्ये कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे. यापैकी एकूण 96 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Advertisement

दरवर्षी पेक्षा यावर्षी निकाल आधीच लागला आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना इतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी तसेच उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठ हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षा लवकर सुरु केल्या होत्या. नेहमीप्रमाणे यावेळीही निकालात मुलींची कामगिरी चांगली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार 37 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच 1929 महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल हा 93 टक्के होता. यंदा तो 91.88 टक्के झाला असून निकालाची टक्केवारी घटली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 93.64 टक्के इतका लागला असून कोकणच्या खालोखाल कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2025 मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 73 परीक्षा केंद्रांवर 50 हजार 826, सातारा जिल्ह्यात 34 हजार 576, सांगली जिल्ह्यातील 32 हजार 830 अशा सुमारे 1 लाख 18 हजार 232 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. बारावीची परीक्षा यंदा 11 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होत असून त्याची प्रिंट काढून घेता येणार आहे.

विभागनिहाय निकाल खालीलप्रमाणे -

कोकण- 96. 74
कोल्हापूर- 93.64
मुंबई-92.93
छत्रपती संभाजीनगर- 92.94
अमरावती- 91.43
पुणे- 91.32
नाशिक- 91.31
नागपूर- 90.62
लातूर- 89. 46

Advertisement
Tags :
(Mumbai)@kolhapur#higher education#kokan#latur#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia12 Board ExaminationsHSC Result 2025HSC result 2025 LiveHSC result 2025 update
Next Article