For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचएसबीसी करपूर्व नफा तेजीत

07:00 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
एचएसबीसी करपूर्व नफा तेजीत
Advertisement

वाढीसह नफा 1.68 अब्ज डॉलरवर : नव्या 20 शाखांना मान्यता

Advertisement

नवी दिल्ली : 2024 मध्ये एचएसबीसी इंडियाचा करपूर्व नफा 1.68 अब्ज डॉलरचा झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या 1.51 अब्ज डॉलर्सपेक्षा 11.27 टक्क्यांनी जास्त आहे.  संपत्ती आणि वैयक्तिक बँकिंग विभाग, व्यावसायिक बँकिंग आणि जागतिक बँकिंग आणि बाजारपेठेतील वाढीमुळे नफा वरीलप्रमाणे प्राप्त करणे शक्य झाले आहे.

वेल्थ आणि वैयक्तिक बँकिंग विभागातील नफा 9.6 दशलक्ष डॉलर्सचा होता, तर ग्लोबल बँकिंग आणि बाजारपेठेतील नफा 875 दशलक्ष डॉलर्सचा होता. व्यावसायिक बँकिंगचा नफा 448 दशलक्ष डॉलर्सचा होता आणि कॉर्पोरेट सेंटरचा एकूण नफा 269 दशलक्ष डॉलर्सचा होता. नफ्याच्या बाबतीत, एचएसबीसी भारत, ब्रिटन आणि हाँगकाँगपेक्षा किंचित मागे आहे.

Advertisement

चीन आणि कॅनडामधील सहयोगी कंपन्यांकडून नफा वाढला. एकूणच, लंडन-मुख्यालय असलेल्या बँकेला 2024 मध्ये करपूर्व नफा 32.3 अब्ज डॉलर्सचा अपेक्षित आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 अब्ज डॉलर्स जास्त आहे. 2024 पर्यंत कॅनडामध्ये बँकिंग व्यवहारांमध्ये बँकेला 4.8 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला होता. त्याच वेळी, अर्जेंटिनामध्ये व्यवसाय एकत्रीकरणामुळे 1 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. परकीय चलन साठा आणि इतर कारणास्तव 5.2 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :

.