कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाऊ इज द जोश ? हाय सर...!

01:21 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर  / संतोष पाटील : 

Advertisement

लांबणीवर पडलेल्या निवडणुका, बदलेली प्रभागरचना आदी कारणांने इच्छुकांचा उत्साहच मावळला होता. निवडणूक लढवणार आहे, परंतू बघू, अशी सावध भूमीका सर्वपक्षीय इच्छुकांची असल्याने निवडणूक माहोल असूनही इतना सन्नाटा क्यो है भाई..! असे म्हणण्याची वेळ आली होती. न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केल्याने इच्छुक कमालीचे रिचार्ज झाले असून हाऊ इज द जोष ... हाय सर..असे म्हणत पळत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली. दरम्यान, महापालिकेने तब्बल तीनवेळा आरक्षणाची सोडतही काढली. इच्छुकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. प्रभागातील तरुण मंडळे, लहान मोठे कार्यकर्ते आदीसह गल्ली बोळात इच्छुकांचा वावर वाढला. प्रभागातील बारशापासून मयतापर्यंत आणि वाढदिवसापासून लग्नापर्यंत इच्छुकांची हजेरी दिसत होती. कार्यकर्त्यांतही इर्षेचे वातावरण तयार झाले. मात्र, कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले. तरीही इच्छुक प्रभागात तग धरुन होते.

दरम्यान, राज्य शासाने बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर केली. तीन प्रभागांचा एक याप्रमाणे आराखडा तयार करुन राज्य शासनाला जाहीर करण्यात आला. प्रभागांची संख्याही वाढून ती 81 वरुन 92 पर्यंत गेली. आता निवडणुका मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले. तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुका दिर्घकाळ लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा उत्साहच मावळला होता. आता पुन्हा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रभाग रचना काहीही होवू दे, आजूबाजूचा कोणताही प्रभाग असून दे, निवडणूक लढवायचीच या इर्षेने अनेकांनी कंबर कसली आहे.प्रभागातील निवडणूक फेव्हरही वाढत आहे. प्रभागातील तरुण मंडळांसह अनेकांच्या मागण्यांचा कानोसा घेवून मंडळ, भाग पॅक करण्याची यंत्रणा सक्रिय झाली आहे. नव्याने आरक्षण, बहू सदस्यीय प्रभाग रचना, यातून निर्माण होणारी राजकीय चुरस, नवी राजकीय आव्हाने यामुळे प्रभागवार राजकीय सारीपाट नव्या मांडला जाणार आहे. प्रभाग रचनेसह निवडणूक तारीखेची घोषणा होईपर्यंत शहरातील निवडणुक ज्वर मात्र टीपेला पोहचणार आहे.

नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी राबण्याची वेळ आली आहे, महायुतीत एका पेक्षा अधिक दावेदार असलेल्या जागांवर मैत्रीपूर्ण लढती करु, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना रिचार्ज करत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 16 फेब्रुवारी 2015 च्या कोल्हापूर द्रौयात स्थानिक संस्था निवडणुकांचे वातावरण गरम केले होते. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ना. हसन मुश्रीफ यांनीही अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. यामुळे महायुती एकदिलाने लढली तरी काटजोड लढती होणार आहेत. तुलनेत महाविकास आघाडीची सुत्रे आमदार सतेज पाटील यांच्याकडे असल्याने येथे जागा वाटपाचा तिढा लवकर तुलनेत लवकर सुटण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहेच, या जोडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्याने कार्यकर्त्यांना खूप कमी स्पेस असेल, अशी तक्रार होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनीच मैत्रीपूर्ण लढतीचा उतारा दिल्याने इकडे तिकडे करणारे काठावरचे कार्यकर्ते पक्षासोबत बांधिल राहण्याची तजवीज केली आहे. महाविकास आणि महायुतीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत पक्षांतर्गत इर्षा टोकाला जावू शकते. 81 प्रभागात तुल्यबळ उमेदवार देण्याचे मोठे आव्हान दोन्ही बाजूला आहे. सर्वच पक्षात अलबेल दिसत असले तरी निवडणुकीच्या तोंडावर आऊटगोईंग रोखण्याची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसमधील सुमारे 10 माजी नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आणि महायुती दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तरी अनेक प्रभागात एकमेकाला बाय दिला. आता हीच खेळी ताकदीने महायुती खेळू शकते. आमदार सतेज पाटील यांच्यासाठी महापालिका आणि जिल्हापरिषदेची निवडणूक महत्वाची आहे. पॉलिटिक कमबॅकसाठी ते या निवडणुकीत ताकदीने उतरतील. यापूर्वी महाविकास आघाडी ताकदवान तर होतीच आणि त्यांची सर्व सुत्रे आमदार पाटील यांच्या हाती होती. आता त्यांचे खंदे राजकीय समर्थक मंत्री हसन मुश्रीफ विरोधी गोठात आहेत. ही उणीव भरुन काढत आमदार सतेज पाटील यांना एकट्याला जोडण्या घालाव्या लागणार आहेत.

एकूण - 81

काँग्रेस -30

राष्ट्रवदी - 14

ताराराणी आघाडी - 19

भाजप - 14

शिवसेना - 4

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article