अंबाबाई किरणोत्सवातील 12 अडथळे कसे निघणार ?
कोल्हापूर / संग्राम काटकर :
अंबाबाईचा किरणोत्सव जवळ आला किंवा सुऊ झाला की त्यातील अडथळ्यांचा विषय चर्चेला येतोच. मग मंदिराच्या पश्चिमेला ताराबाई रोडवऊन अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून देवीच्या मूर्तीपर्यंत जाणाऱ्या सूर्यकिरणांच्या आड येणारे फलक, होर्डींग हटवले जातात. परंतु किरणोत्सवातील खरे अडथळे म्हणून ब्ल्यू लाईनने मार्किंग केलेल्या ताराबाई रोडवरीलच इमारतीच्या काही भागांबाबत महापालिकेने उपाय शोधलेला नाही.
आज ना उद्या उपाय केला जाईल, या प्रतिक्षेत 17 वर्षे गेली. अशातच गेल्यावर्षी टेलिस्कोपमधून केलेल्या पाहणीत आणखी 7 इमारतीच्या भागांचे अडथळेही अभ्यासकांना दिसले आहेत. किरणोत्सवातील या अडथळ्यांचे करायचे तरी काय, असा सवाल करत त्यावर कायमचा उपाय शोधावा, असे पत्र देवस्थान व्यवस्थापन समिती महापालिकेला देणार आहे.
ताराबाई रोडवरील अडथळ्यांवर उपाय शोधल्यास किरणोत्सवात सूर्यकिरणे अंबाबाईच्या संपूर्ण मूर्तीवर टिकून राहतील, असा दावा देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केला आहे. अंबाबाई मंदिरातील किरणेत्सव हा भाविकांच्या दृष्टीने औत्सुक्याचा विषय असतोच, शिवाय मंदिर निर्मितीमागील स्थापत्यशास्त्रही किरणोत्सवातून स्पष्ट होते.
9 ते 13 नोव्हेंबर व 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान, मंदिरातील होणाऱ्या किरणोत्सवात सूर्यकिरणे अंबाबाईच्या पूर्ण मूर्तीवर काही मिनिटे तरी स्थिरावीत, अशाही सर्वांची भावना असते. शिवाय सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात येणाऱ्या आणि हळूहळू गाभाऱ्यातील अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत जाणाऱ्या सूर्यकिरणांचा प्रवास भाविकांच्या दृष्टीने आनंददायी असतो.
अपवाद वगळता सूर्यकिरणे अंबाबाईच्या चरणांपासून ते किरीटापर्यंत जाऊन स्थिरावत नाहीत, याला अडथळेच जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. हे अडथळे दोन प्रकारचे आहेत. एक नैसर्गिक आणि दुसरा मानवनिर्मित. हवेतील आर्द्रता, धुके, धुलीकण नैसर्गिक अडथळ्यात तर बांधकाम, फलक मानवनिर्मित अडथळ्यात येतात. नैसर्गिक अडथळ्यांबाबत काहीच करता येत नाही, हे उघड आहे. परंतु मानवनिर्मित अडथळ्यांबाबत निश्चित उपाययोजना करता येणे शक्य आहे.
अंबाबाई मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या ताराबाई रोडवरील सूर्यकिरणांच्या आड येणाऱ्या इमारतीची पाहणी 2007-08 मध्ये अभ्यास गटाने टेलिस्कोपने केली होती. यात पाच इमारतींचे छोटेसे बांधकाम सूर्यकिरणांना अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत जाण्यास अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट दिसले होते. या अडथळ्यांबाबत उपाय करण्यासाठी महापालिकेने ब्ल्यू लाईनने बांधकामांवर मार्किंग केले. गेल्यावर्षी सूर्यकिरणांमध्ये आणखी कोणते अडथळे येतात, हे पाहण्यासाठी अभ्यास गटाने मंदिरातील कासव चौकातून ताराबाई रोडवरील इमारतींची पाहणी केली. यात इमारतीच्या 7 भागांचा अडथळा दिसला. त्यामुळे पूर्वीचे ब्ल्यू मार्किंग केलेले 5 व नव्याने दिसलेले 7 असे 12 अडथळे आजही कायम आहेत. हे अडथळे संबंधित इमारत मालकांनी मुद्दाम केलेले नाहीत, हे खरे आहेत. परंतु हे अडथळे 25 वर्षांपासून किरणोत्सवात व्यत्यय ठरत आहेत. त्यामुळे अडथळ्यांबाबत उपाय योजना करणे जऊरीचे झाले आहे. उपाय योजना केल्याने सूर्यकिरणे विना अडथळा अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी चौकोनी जागा तयार होणार आहे. तसेच सूर्यास्ताच्या आधीच्या वेळेपर्यंत सूर्यकिरणे अंबाबाईच्या संपूर्ण मूर्तीवर स्थिरावण्यास मदत होणार असल्याचे अभ्यासगट व देवस्थान समितीचे म्हणणे आहे.
- महापलिकेच्या बेेठकीत आढवा घेतला जाणार
अंबाबाई किरणोत्सव समितीचे अध्यक्ष हे खुद्द जिल्हाधिकारी असतात. त्यांच्यासमोर किरणोत्सव आड येणाऱ्या इमारतीच्या बांधकामांचे भाग आणि किरणोत्सव अभ्यासगटाचे म्हणणे काय आहे याचा आढावा घेतला जाईल. त्यात जे निर्णय होतील, त्यानुसार पुढील ताराबाई रोडवरील इमारत मालकांशी चर्चा कऊन अथडळ्यांबाबत उपाय योजना केली जाईल.
विनय झगडे, सहायक संचालक, नगर रचना विभाग