For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन'चा ट्रेलर प्रदर्शित

07:00 AM Feb 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
 हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

लाइव्ह अॅक्शन फिल्म ‘हाउ टू ट्रेन योर ड्रॅगन’चा ट्रेलर जारी झाला आहे. हा लाइव्ह अॅक्शन फीचर ड्रीमवर्क्स  अॅनिमेशनच्या याच नावाच्या हिट अॅनिमेटेड चित्रपटाचा रिमेक आहे, जो 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. लेखक-दिग्दर्शक डीन डेब्लॉइस यांच्या नव्या हाउ टू ट्रेन योर ड्रॅगनमध्ये मेसन थेम्स हिकप आणि निको पार्कर एस्ट्रिडच्या भूमिकेत आहे. याच्या कलाकारांमध्ये गेरार्ड बटलर, निक फ्रॉस्ट आणि ज्युलियन डेनिसन सामील आहेत. डेब्लाइस प्रारंभापासूनच या फ्रेंचाइजीशी जोडलेले राहिले आहेत. डेब्लॉइनस नव्या चित्रपटाची कहाणी लिहित दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट 2010 च्या अॅनिमेटेड चित्रपटावर आधारित आहे, मूळ हाउ टू ट्रेन योर ड्रॅगनच्या दरम्यान व्यग्र शेड्यूल आणि मर्यादित साधनसामग्रीमुळे काही पैलूंचा पूर्णपणे शोध घेता आला नव्हता. हे नवे वर्जन माइथोलॉजिकल कहाणीचा विस्तार करणार असल्याचे डीन डेब्लॉइस यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.