For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Small Investment Planning: गुंतवणुकीचे नियोजन करताना काय काळजी घ्यायची?

03:17 PM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
small investment planning  गुंतवणुकीचे नियोजन करताना काय काळजी घ्यायची
Advertisement

खालील काही घटकांची पडताळणी करुनच गुंतवणूक करणे हिताचे आहे

Advertisement

By : सागर कांबळे

कोल्हापूर : सर्व सामान्यांसह दिग्गज उद्योगपत्ती कोठेही गुंतवणूक करताना संबंधी योजनेची माहिती घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र सर्वसाधारणपणे गुंतवणूक करण्यापूर्वीच याबाबतची काळजी घेतल्यास भविष्यातील जोखीम कमी राहते.

Advertisement

विविध जाहीराती, संबंधित योजनेची माहिती देणारे लोक यासह अन्य घटकही गुंतवणूक करण्याच्या नियोजनावर परिणाम करत असतात. पंरतु कमीत कमी धोका प्राप्त करुन सुरक्षित गुंतवणूक योजना आखण्यासाठी खालील काही घटकांची पडताळणी करुनच गुंतवणूक करणे हिताचे आहे.

खालील घटकांची पडताळणी करावी

  • गुंतवणुकीची माहिती देणारी महत्वाची कागदपत्रे पाहणे.
  • दस्ताऐवजांमधील कायदेकलमांची माहिती जाणून घ्यावी.
  • गुंतवणूक करताना येणारा खर्च व त्यात नफा किती होईल हेही पाहावे.
  • आपण करत असलेली गुंतवणूक योजना आपल्या गरजेप्रमाणे आहे की नाही
  • याची माहिती जाणून घ्यावी.
  • संबंधित एंजटकडून गुंतवणुकीच्या तपशीलाची माहिती करुन घ्यावी.
  • ज्या योजनेत आपण गुंतवणूक करणार आहे, ती किती सुरक्षित आहे ते सविस्तरपणे बघावे.
  • आपण करत असलेल्या गुंतवणूक योजनेत काही अडचण आली तर त्यामधून बाहेर
  • निघण्याचा रस्ता अगोदरच माहिती कऊन घ्यावा. अन्यथा गुंतवणूक करु नये.
Advertisement
Tags :

.