For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुजन कसा मन चोरी...

06:22 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
सुजन कसा मन चोरी
Advertisement

सहज संध्याकाळी रेडिओ लावून बसलेलं असताना एकाएकी कुमार गंधर्वांच्या स्वरातलं ‘सुजन कसा मन चोरी’ हे गाणं कानावर पडलं आणि जे काही वाटलं ते शब्दात सांगता येण्याजोगं नव्हतंच. बरं अशी गाणी एकदा ऐकून कधीही समाधान होणे शक्यच नसतं. आणि त्यासाठी आधुनिक काळातली साधनं उपयोगी पडतात. 

Advertisement

आज काल आपण म्हणू त्या पद्धतीचं, म्हणू त्या प्रकारचं, म्हणू त्या चित्रपटातलं आणि नाटकातलं, आपण म्हणू ते गाणं एका क्लिकवर हजर असतं. परंतु आम्हा ऐंशीच्या दशकातल्या पिढीची एक खोड अजूनही टिकून आहे. ती म्हणजे रेडिओ ऐकणे. आता तर रेडिओही मोबाईलवर आलाय ते सोडा. पण असाच मोबाईल वरती रेडिओ लावून ठेवला आणि आकाशवाणीचे कार्यक्रम चालू ठेवले की आपल्याला सरप्राईज देत येणारी एक एक गाणी ऐकायला जी मजा येते त्याला तोड नाही. आणि एकदा वाटतं खरंच की! आपण कोणत्याही वयात गेलो तरी सरप्राईज मिळण्याची हौस आणि सरप्राईज मिळाल्यानंतरचा आनंद या गोष्टी आपल्यासाठी कधीही तितक्याच भारी असतात. ताज्याच असतात.

हे एवढं सगळं पुराण सांगण्याचं कारण एकच की असं सहज संध्याकाळी रेडिओ लावून बसलेलं असताना एकाएकी कुमार गंधर्वांच्या स्वरातलं ‘सुजन कसा मन चोरी’ हे गाणं कानावर पडलं आणि जे काही वाटलं ते शब्दात सांगता येण्याजोगं नव्हतंच. बरं अशी गाणी एकदा ऐकून कधीही समाधान होणे शक्यच नसतं. आणि त्यासाठी आधुनिक काळातली साधनं उपयोगी पडतात. त्याच्यामुळे लगेच

Advertisement

स्पॉटिफाय यूट्यूब वगैरे वर धाव घेतली आणि ते गाणं लूप मोडवर लावून ठेवलं. आणि मग विचार करत बसले की या गाण्यात एवढा लडिवाळपणा का दाखवलाय कुमार गंधर्वांनी? मग मनात विचार आला आपण ब्दल्tल्ंा वर बालगंधर्व शोधून बघूया का? आणि त्याप्रमाणे बालगंधर्वही शोधले. इतक्या जुन्या रेकॉर्डिंगमध्येही त्यांचा स्वर आणि त्यातला लडिवाळपणा इतका काही जाणवत होता की पुन्हा एकदा विचारात पडायला झालं. या माणसांना आपण प्रत्यक्षात ऐकण्याचा कधी प्रश्नच नव्हता. ही माणसं गात असताना यांच्या मनात नक्की असं काय सुरू असेल जे त्यांच्या स्वरास्वरांतून पाझरत येतं? प्रत्येक सुराला ओंजारून गोंजारून गायला या माणसांना जमतं तरी कसं? हे प्रश्नाचं चक्र माझ्या डोक्यात तसंच फिरत राहिलं. आता ते चक्रच म्हटल्यानंतर गती ओघानी आली. गती आली म्हटल्यानंतर विचार पुढे जाणे हेही ओघानं आलं. तर विचारांना काही दिशा मिळत नव्हती.हल्ली ‘भिंतीला कान असतात’ ह्या वाक्प्रचाराऐवजी ‘मोबाईलला कान (आणि नाक डोळे हावभावही) असतात’ असा नवा वाक्प्रचार करायला हरकत नाही. माझ्या मनातला हा विचार, आणि मी घेतलेला सर्च याला अनुसरून लगेच फेसबुकने कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातलं हे गाणं मला दाखवलं. अर्थात हा व्हिडिओ होता.

कीर्तीताई शिलेदारांचं गाणं हा अनेकांच्या नावडीचा विषय सुद्धा असू शकतो. काहींना तो स्वर फारच तीव्रही वाटतो. असंही मी ऐकलेलं आहे. परंतु त्यांचा मोठेपणा आणि गायन या सर्वच गोष्टी वादातीत म्हणाव्या लागतील. पण कीर्तीताईंचं बलस्थान कोणतं हे त्या एका व्हिडिओत मला कळून चुकलं. ते म्हणजे मुद्राभिनय आणि विशेषत: नेत्राभिनय. ही सोपी गोष्ट मुळीच नाही. त्यांचा कायिक अभिनय, मुद्राभिनय ह्या सगळ्यांच्या निरीक्षणानंतर मला एक गोष्ट कळून चुकली की आपण जे रेकॉर्डिंग ऐकलं ते कुमार गंधर्वांचं होतं. आणि ते फक्त

ऑडिओसाठी होतं.

म्हणजेच आपण जो दृक अनुभव घेतो तो सर्व अनुभव घेताना फक्त आणि फक्त स्वरांमधून दाखवायचा होता. कारण ते नाट्यागीत त्यांनी बैठकीचं नाट्यागीत म्हणून सादर केलं होतं. मग स्वराला आकृतीच नव्हे रूप, गंध, रस, दृष्टी या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या होत्या आणि प्रत्येक स्वरासोबत एकेक सजीव आकृती ऐकणाऱ्याच्या कानावाटे त्याच्या मन:पटलावर साकार होण्याचा प्रवास सुरू झाला. मनातल्या मनात हा सगळा प्रवासाचा धांडोळा घेत असताना मला असं वाटायला लागलं की बारा स्वर वापरून केल्या जाणाऱ्या एका गाण्यात किती विचार करावा लागत असेल? किंबहुना तो विचार प्रत्येक गायकाकडून वेळोवेळी त्यांच्या मनोभूमिकेप्रमाणे किती आणि कशा प्रमाणात केला जात असेल हा न संपणारा विषय आहे.

जेव्हा ते गाणं आपला विचार माझ्या मनात सोडून निघून गेलं त्या वेळेला मला दोन्ही सादरीकरण आलटून पालटून आठवत राहिली. की मुद्राभिनयाद्वारे किंवा कायिक अभिनयाद्वारे किती सुंदर त्यांनी व्यक्त केलं होतं! आणि त्यांनी व्यक्त केलेलं सगळं दृक माध्यम कुमार गंधर्वांसारख्या मोठ्या गायकांनी नुसत्याच श्राव्य माध्यमातून कसं मांडलं होतं! काय कमाल वर्णन आहे ना प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनाचं! या नाट्यापदाचं यश हे आहे की ज्या वेळेला त्याच्या शब्दांकडे अतिशय लक्षपूर्वक आपण पाहतो त्यावेळेला प्रेमात पडलेल्या मुलीची अवस्था आणि तिचा प्रियकर किती देखणा असेल, किती छान असेल, किती लबाड असेल किती छळवादी असेल, आणि त्याचं तिला हे छळणं किती हवंहवंसं वाटत असेल या सगळ्या भावना एकावेळी आपण अनुभवतो. शब्द अधिक सुंदर की सूर अधिक सुंदर, हा प्रश्न तर सोडवूच नये. थेट बडा ख्यालच्या स्टाईलमध्ये असणारं हे गाणं गाण्याच्या क्षेत्रातल्या बुद्धिमान आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्वांना त्याची बढत कशी कमाल आहे,

स्वरविलास किती सूक्ष्म आहे याचा विचार करत राहायला भाग पाडतही असेल. परंतु सर्वसामान्य श्रोत्याला त्यातून व्यक्त होणारे भाव किती सुंदर आहेत याच मोहात अडकायला होतं. म्हणजे या अवस्थेचं वर्णन करण्यासाठीसुद्धा एक नाट्यागीत आहेच! ते म्हणजे ‘घेई छंद मकरंद’ मोठी मोठी लाकडं लीलया पोखरणाऱ्या भुंग्याला कमळाच्या पाकळ्या पोखरणं काय कठीण असतं का? पण नाही जमत! मोहपाश वाईट असतात. किती सुंदर आहे ती तक्रार! आपल्या सखीला उद्देशून ती म्हणते सुजन कसा? म्हणजे हा काही सज्जन आहे का? चांगला लबाड आहे! का बरं? तर मना चोरी म्हणजे माझं हृदय चोरून घेऊन गेला. आणि त्याचं वर्णन जे तिने केलंय!

सहज नेत्र भिडे सहज मोह पडे,

सहजची करी मम हृदय वेडे!

सर्वार्थाने सुंदर पुरुषाचं मोठं वैशिष्ट्या असं, की त्याच्या नजरेला नजर दिल्यानंतर आपण आपलं सर्वस्व गमावून बसलो हे कळतं केव्हा? तर भेट पूर्ण होऊन आपण घरी गेल्यानंतर. त्याच्यानंतर जेव्हा एकाही कामात त्या स्त्राrचं लक्ष लागायचं बंद होतं तेव्हा तिच्या लक्षात येतं. तो हृदय चोरून नेतो तो सुद्धा इतक्या कौशल्याने की जणू काही भुंग्याने फुलातला मध खाऊन निघून जावं! पुरुषी सौंदर्याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याच्यातली मोहिनीराज अवस्था शांतपणे कार्यरत असते. आणि कृष्ण हा तर पुरुषोत्तम! त्यासाठी त्यावेळी आदरणीय बखलेबुवांनी योजलेला रागही किती कल्पकतेने योजला असेल! कारण तो राग मोठा आहे असं कलाकार मंडळी म्हणतात आणि आरोही जातानासुद्धा सारखं अवरोही मुरडून बघत राहणं हे त्याचे वैशिष्ट्या आहे!

अॅड. अपर्णा परांजपे प्रभु

Advertisement
Tags :

.