For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायीची किंमत किती...

06:16 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
गायीची किंमत किती
Advertisement

भारतात, विषेशत: हिंदू धर्मात गाय ही देवता मानली गेली आहे. ‘गोपूजन’ हा हिंदू संस्कृतीचा विशेष भाग आहे. गायीचे दूध उपयुक्त आहार आहे. अनेक परिवार गोपालन करुन आपला चरितार्थ चालवत असतात. पण अशा या पवित्र गायीची किंमत किती असते, असा प्रश्न विचारल्यास उत्तर 20 हजार रुपयांपासून 2 लाख रुपयांपर्यंत असू शकते. गायीची प्रजाती आणि तिची दूध देण्याची क्षमता, तसेच दुधातील स्निग्धांश आदी घटकांवर गायीची किंमत ठरते. पण गायीची किंमत ही कोट्यावधी रुपयांमध्ये असू शकते, यावर कदाचित आपण विश्वास ठेवणार नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. हा सर्वाधिक किमतीचा विक्रम ब्राझीलमधील एका गायीने केला आहे. तिची किंमत इतकी आहे, की तेव्हढ्या संपत्तीत कोणीही जगातील महागड्या शहरांमध्ये एक बंगला बांधू शकेल किंवा तो अनेक महागड्या डिफेंडर गाड्या घेऊ शकेल. ही गाय ‘व्हियाटिना-19’ या प्रजातीतील आहे. विशेष बाब अशी की, या गायीचा भारताची जवळचा संबंध आहे.

Advertisement

ही गाय भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या नेल्लोर या जिल्ह्यात आढळणाऱ्या गायीच्या वंशातील आहे. तिची किंमत लिलावात 35 कोटी ते 40 कोटी अशी पोहचलेली आहे. त्यामुळे ती जगातील आतापर्यंतची सर्वात महागडी मानली जाते. नेल्लोर वंशाच्या गायींची अनेक वैशिष्ट्यो असतात. तिची त्वचा चमकदार असते. तिच्यावर आकर्षक अशी लव असते. पण यापेक्षाही ही गाय अत्यंत दणकट असून तिची रोगप्रतिकार शक्ती अन्य कोणत्याही गायीपेक्षा अधिक असते. तसेच ती अत्यंत उष्ण वातावरणही सहन करु शकते. त्यामुळे बाझीलसारख्या विषुववृत्तीय उष्ण हवामानाच्या प्रदेशातही तिचे दुधाचे प्रमाण कमी होत नाही. या गायीची त्वचा जाड आणि घर्मग्रंथीयुक्त असल्याने तिच्यावर गोचीड किंवा अन्य कीटक अत्यंत कमी प्रमाणात असतात. यामुळे तिची किंमतही इतकी प्रचंड असू शकते.

Advertisement
Advertisement
Tags :

.