For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपल्या नावे किती सिम? .. घरीच तपासा

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपल्या नावे किती सिम     घरीच तपासा
Advertisement

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया : आपल्या सिमचा गैरवापर होण्यापासून वाचता येईल

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली  

अनेक वेळा असे दिसून येते की कोणाच्यातरी आयडीवर दुसरी व्यक्ती सिम चालवत असते आणि आयडी असलेल्या व्यक्तीला त्याची माहितीही नसते. अशा परिस्थितीत अनेक वेळा एखाद्या निष्पाप व्यक्तीला त्या सिमचा दुसऱ्या व्यक्तीकडून गैरवापर केल्यामुळे अडचणीला सामोरे जावे लागते. यामुळे आपल्या नावे किती सिम सक्रिय आहेत? नावावर किती सिम आणि कोणते नंबर सक्रिय आहेत हे आता आपणास दोन मिनिटांमध्ये घरबसल्या शोधता येणार आहे. याकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्कही द्यावे लागणार नाही.

Advertisement

अशी शोधा आपल्या नावची सिमकार्ड.....

  • प्रथम tafcop.dgtelecom.gov.in  पोर्टलवर जा.
  • येथे बॉक्समध्ये तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि ध्ऊझ् कीच्या मदतीने लॉग इन करा.
  • आता आपल्या आयडीसोबत चालू असलेल्या सर्व नंबरचे तपशील दिसतील.
  • आपणास माहीत नसलेल्या यादीत कोणताही नंबर असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
  • यासाठी नंबर आणि ‘नॉट माय नंबर’ निवडा.
  • आता तळाशी असलेल्या रिपोर्ट बॉक्सवर क्लिक करा.
  • तक्रार दाखल केल्यानंतर तिकीट आयडी संदर्भ क्रमांक देखील मिळतो.
  • यानंतर संबंधीत क्रमांक बंद होईल किंवा तुमच्या आधार कार्डमधून काढून टाकला जाईल.

एका आयडीवर 9 सिम घेता येतात नियमानुसार, एका आयडीवर 9 सिम सक्रिय करता येतात, परंतु जम्मू-काश्मीर, आसामसह ईशान्येकडील राज्यांच्या आयडीवर 6 सिम सक्रिय करता येतात.

Advertisement
Tags :

.