बिंदू चौकात पार्किंगची अजून किती दिवस प्रतीक्षा ?
कोल्हापूर / रूपाली चव्हाण :
शहरातील ऐतिहासिक बिंदू चौकातील सुशोभीकरण पाहून पर्यटक भारावून जातात़ पण येथे असलेल्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. बिंदू चौक आवारात भवानी मंडप ते सब जेल हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी म्हणजे वनवे केला आहे. पण वाहनधारक यातून उलट्या दिशेने जात असल्याने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. बिंदू चौकात सहा रस्ते एकत्र येत असल्याने तसेच रिक्षा स्टॉप, हातगाड्या असल्याने आणि पार्किंगसाठी जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत हा चौक दैनंदिन अडकल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
कोल्हापुरात येणारे पर्यटक ऐतिहासिक बिंदू चौकात येतात. आपली वाहने येथील खंदकात असलेल्या वाहन तळावर पार्किंग करून ते अंबाबाई, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जातात. अंबाबाई मंदिराकडून पुर्वेला असलेला करवीर नगर वाचन मंदिरासमोरून येणारा हा रस्ता बिंदू चौक कमानीपर्यत एकेरी केलेला आहे. हा मार्ग नेहमीच रहदारीचा बनला आह़े हा मार्ग एकेरी असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक निर्माण होत़ो भवानी मडप ते सब जेल हे दोन रस्ते वनवे आहेत़ तरीही वाहनधारक वनवे तोडून येथील कमानीतून उलट्या दिशेने जात असतात. अनेक वाहनधारकांनी छत्रपती ]िशवाजी महाराज चौकाच्या दिशेने तेंड करून चारचाकी लावलेल्या असतात़ त्यामुळे केएमटी चालकाला तारेवरची कसरत करून हा रस्ता पार करावा लागत़ो केवळ वाहतुकीची केंडी होत असल्याने अनेकाना येथील वाहतुकीच्या कोंडीचा मन:स्ताप अन्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

- वाहतुकीस अडथळा
-बिंदू चौकात गेल्या अनेक वर्षापासून सिग्नंल बंद अवस्थेत आहेत़
-काही वाहनधारक ]िशवाजी चौकाकडून उलट्या दिशेने बिंदू चौकाकडे येतात़
-छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पुर्वैला बिंदू चौकाकडे जाताना, जिथे रस्ता संपतो तिथेच रिक्षा थांबा असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.
-वाहतुकीचे नियम पाळण्याऐवजी ते तोडण्यातच वाहनधारकांनी धन्यता मानली आह़े
-एकेरी वाहतुकीचे उल्लंघन वाहनधारकांकडून होत असत़े
-सायंकाळी बिंदू चौकाच्या पुर्वेस हातगाड्या उभ्या असतात़ येथे गर्दी होत़े
- पर्यटकांची पार्किंगची गैरसोय
-बाहेरून अलेल्या पर्यटकांची वाहन पार्किंगची गैरसोय होत़े
-पर्यटक बिंदू चौकातील गल्लीत चारीबाजूच्या रोडवर जिथे जागा मिळेल तेथे गाडी पार्कीग करून देव दर्शनाला जातात़
- बिंदू चौकात पर्यटकांची पर्किंगची सोय ही गंभीर समस्या आह़े
- दिशादर्शक फलक वाकलेल्या अवस्थेत असल्याने वाहनधारकांना दिसत नाहीत.
- बिंदू चौकात अरूंद जागा असून पार्किंगची महापालिकेकडून सोय असली तरी त्याला मर्यादा आहेत.
- अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे आरोग्यास धोका
बिंदू चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे एकेरी मार्ग आहे. पण रेथे बुरूजाला लागूनच रस्त्याच्या डाव्या बाजूस सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. पण त्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अपुरा पाण्याच्या सु]िवधामुळे नागरिकांच्या व महिलांच्या आरोग्यास धोका आह़े
- व्यावसायिकांचे अतिक्रमण
व्यावसायिकांनी आपल्या दुकानाचे बोर्ड रस्त्यावरच ठेवले आहेत़ तेही तुटलेल्या अवस्थेत आहेत़]िबंदू चौकात पार्कीगची सोय अपुऱ्या प्रमाणात असल्याने दुकानांसमोर जागा ]िमळेल तेथे गाड्या पार्किंग करून दहाच ]िमनिटात आलो, असे काही जण सांगून जातात़आणि एक-दोन तासाने येतात़ त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आह़ेत. अर्धवट विकासकामाचा नागरिकांना, पर्यटकांना व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आह़े सार्वजनिक स्वच्छतागृह चौकात आहे. पण ते अस्वच्छ असून त्याच्या दुर्गधीमुळे नागरिकाना त्रास होत आहे. तसेच शेजारीस केएमटी बस थांबा असलेल्या येथे थांबलेल्या प्रवाशांना त्याचा होत आहे.
- राजुबाबा जाधव़, व्यावसायिक बिंदू चौक