For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशी महिला हरमलात कशी?

02:55 PM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशी महिला हरमलात कशी
Advertisement

पेडणे : हरमल येथे बांगलादेशी महिलेला घुसखोरी केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरु केली आहे. हरमल किनारीभागात पार्किंग जागेमध्ये एक महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची तक्रार मांद्रे पोलिसांकडे आली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शर्मिन बीबी जांतुर सिंगुर (32 वर्षे) या महिलेस ताब्यात घेतले. चौकशीनंतर रविवारी तिला रितसर अटक करण्यात आली. चौकशीत ती बांगलादेशची रहिवासी असल्याचे आढळून आले. तिच्याकडे कसल्याच प्रकारचे दस्तऐवज नाही. पोलिसांनी तिच्यावर घुसखोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास मांद्रे पोलिस निरीक्षक गीरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Advertisement

उपस्थित झालेले प्रश्न

  • शर्मिन बीबी सिंगुर हिने बांगलादेशातून भारतात घुसखोरी कशी केली?
  • भारतातील एवढा प्रवास करुन ती गोव्यात कशी पोहोचली?
  • हरमलमध्ये ती कुठे राहते? कुणाकडे भाड्याच्या खोलीत राहिली?
  • नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येण्याचा तिचा उद्देश काय असावा?
Advertisement
Advertisement
Tags :

.