कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रालय विमानतळावर हुथींचा क्षेपणास्त्र हल्ला

06:40 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एअर इंडियाचे विमान वळवले : तेल अवीवला जाणारी उड्डाणे 6 मे पर्यंत स्थगित

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

इस्रायलमधील सर्वात व्यस्त विमानतळ असलेल्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी येमेनच्या इराण समर्थित हुथी बंडखोरांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामुळे दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय139 अबू धाबीला वळवावे लागले. तसेच सावधगिरीची उपाययोजना म्हणून पुढील दोन दिवस म्हणजेच 6 मे पर्यंत तेल अवीवला जाणारी सर्व भारतीय उड्डाणे अन्यत्र वळविली आहेत. 4 ते 6 मे 2025 दरम्यानच्या विमानांसाठी तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना तिकीट बदलण्याचा किंवा पूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

भारतातून तेल अवीवच्या दिशेने गेलेले एआय139 हे विमान उतरण्यासाठी फक्त एक तास शिल्लक असताना विमानतळावर क्षेपणास्त्रहल्ला झाला होता. त्यावेळी विमान जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात होते. सदर विमानात सुमारे 300 प्रवासी होते. हल्ल्याची माहिती मिळताच विमान तेल अवीवऐवजी अबू धाबीमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

क्षेपणास्त्र हल्ल्यात 8 जण जखमी

हुथी बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विमानतळ परिसरात असलेल्या रस्त्याचे आणि वाहनांचे नुकसान झाले. आपली संरक्षण प्रणाली हे क्षेपणास्त्र रोखण्यात अपयशी ठरल्याची कबुली इस्रायली सैन्याने दिली आहे. यासंबंधी पडताळणी केली जात आहे. या हल्ल्यात 8 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी हुथी बंडखोरांनी घेतली आहे.

इस्रायलने बोलावली आपत्कालीन बैठक

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हुथींच्या हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक आमंत्रित केली आहे. आम्ही यापूर्वीही हुथींवर कारवाई केली आहे आणि भविष्यातही कारवाई करू. आमचे मंत्रिमंडळ आज संध्याकाळी गाझावरील हल्ल्याच्या पुढील टप्प्यावर चर्चा करेल. आमच्या हल्ल्याचे उद्दिष्ट हमासला पराभूत करणे हेच असल्याचे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article