बोरी पुलाच्या बांधकामात घरे नष्ट होणार नाहीत
मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
बोरी येथील नवीन पुलाचा आराखडा हा चांगला असून यात लोकांची घरे तसेच शेतजमिनी नष्ट होणार नाहीत. काही लोक विनाकारण विरोध करत आहेत, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. बोरी पूल हा खूप जुना झाला असून आता नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. याचा आराखडा तयार केला जात आहे. यात काही जणांची घरे जाणार. तसेच शेतजमिनी नष्ट होणार असे म्हणून विरोध केला जात आहे तो चुकीचा आहे. या पुलाच्या नवीन बांधकामाने एका घराला फटका बसू शकतो. त्याचे नियोजनही केले जाणार आहे. त्यामुळे कुठल्याच अभ्यासाशिवाय विकासकामांना विरोध कऊ नये, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.
पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते. बोरी पूल जुना असल्याने मोडकळीस आला आहे. कधीही दुर्घटना घडली तर मग सरकारला जबाबदार ठेवले जाणार. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधणे गरजेचे आहे. सुऊवातीला प्रत्येक विकासकामांना विरोध होत असतो. नंतर तेच लोक त्याचा लाभ घेत असतात. या अगोदर कोकण रेल्वेला विरोध झाला होता, पण नंतर या विरोधकांनाही या रेल्वेचे महत्त्व कळाले, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
तिळारी कालव्याचे काम 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार
तिळारी कालव्याच्या दुऊस्तीचे काम 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यात पाणी साठा भरपूर आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. तिळारी कालव्याच्या दुऊस्तीचे काम तातडीने पेले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवणार नसल्याचे यावेळी मंत्री शिरोडकर म्हणाले. तसेच लवकर नवीन धरणांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्याचा आराखडा आम्ही तयार केलला आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
तंत्रशिक्षण घेणाऱ्यांना जगभरात नोकरीची संधी
गणित विषयाच्या भीतीमुळेच गोमंतकीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम निवडत नाहीत. याबाबत शाळांमध्ये जागृती होणे आवश्यक असल्याचे मत जलस्रोत मंत्री शिरोडकर यांनी व्यक्त केले. तंत्रशिक्षण घेणाऱ्यास जगभरात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात दरवर्षी सुमारे 25 हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसतात. त्यातील केवळ 5 हजार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अभियांत्रिकी किंवा अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रम निवडतात. याला विविध कारणे आहेत. गणित किंवा भौतिकशास्त्राची भीती हे त्यापैकी एक आहे. अशा अभ्यासक्रमात यश मिळवल्यास मुलांना गोव्याबाहेर रोजगार मिळू शकतो. गोव्यातच नोकरी पाहिजे, सरकारी नोकरीच पाहिजे, अशी मानसिकता बदलायला हवी, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.
तंत्रशिक्षण खर्चिक असते. याचा विचार करून तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. यानुसार विद्यार्थ्याला प्रत्येक वर्षी 90 हजार ते 1 लाख ऊपयांपर्यंत मदत मिळू शकते. सांगे, धारबांदोडा, पेडणे यासारख्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना ही योजना लाभदायक ठरू शकते. मात्र, अनेकांना ही योजना माहितच नाही. या योजनेविषयी अधिक जागृती केली पाहिजे. आमच्या मतदारसंघात आम्ही अशा विविध योजना पालकांना समजावून सांगतो, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
विज्ञान, तंत्रज्ञान महोत्सव 1 डिसेंबरपासून
उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान प्रवाह) व शिरोडा मतदारसंघातील सर्व उच्च माध्यमिक शाळांसाठी राज्यस्तरीय विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मंत्री शिरोडकर यांनी दिली. शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे, तर शनिवारी दुपारी 3 वाजता महोत्सवाची सांगता होईल.