For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोमुनिदादमधील घरे पाडू देणार नाही

11:11 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
कोमुनिदादमधील घरे पाडू देणार नाही
Advertisement

‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार : कोमुनिदाद राहिली तर गावपण राहणार

Advertisement

पणजी : कोमुनिदाद जागेमध्ये उभारण्यात आलेल्या घरांपैकी परराज्यातील व्यक्तींचीही आहेत, हे मान्य करावे लागेल. परंतु 1970 पूर्वीचा कालखंड तपासल्यास यामध्ये सुमारे 80 टक्के गोमंतकीय बांधवांची कोमुनिदाद जागेत घरे आहेत. त्यामुळे सुमारे 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या गोमंतकीय घरांना वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री या नात्याने राहणार आहे. अशा घरांना पाडू न देता जास्तीत जास्त वाचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दिलासा मुख्यमंत्री सावंत यांनी दिला. पणजी दूरदर्शनवरील ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

... तरच गावपण राहणार

Advertisement

ही घरे न्यायालयीन आदेशानुसार पाडली तर ही गोमंतकीय कुटुंबे जाणार कुठे, हा प्रश्न आहे. त्यामुळे यावर कायदा समिती अभ्यास करीत आहे. 30 ते 40 वर्षांपूर्वीची घरे पाडू नयेत, यासाठी आपला मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न आहे. कोमुनिदाद संस्थांनीच बेकायदेशीर घरे उभारणीसाठी विरोध करायला हवा होता. कोमुनिदाद जागा कुणाला द्यायची झाल्यास सर्व प्रक्रिया पार पाडूनच दिली जावी, यासाठी कोमुनिदाद संस्थांनीच विचार करायला हवा. कोमुनिदाद जागा सुरक्षित राहिली तरच गावचे गावपण जपणार आहे, असेही ते म्हणाले.

रुंदीकरणाला सहकार्य करावे

रस्ता ऊंदीकरणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, वाहतूक समस्या सुटण्यासाठी रस्ता ऊंदीकरण होणे फार गरजेचे आहे. त्याला हरकत न घेता नागरिकांनी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जनतेने विचार करायला हवा.

बालरथ अपघातप्रकरणी चौकशी

गुऊवारी झालेल्या बाळ्ळी येथील बालरथ दुर्घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, या घटनेची चौकशी करण्याचे तात्काळ आदेश दिलेले आहेत. अपघातास काही प्रमाणात बालरथ चालक जबाबदार असल्याचे निदर्शनास येते. परंतु सर्व अहवाल हाती आल्यानंतरच बोलणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले.

विहिरी स्वच्छ करण्याच्या सूचना

राज्यातील विहिरी आज सुरक्षित नाहीत. या विहिरी सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या देखभालीच्या सूचना संबंधित खात्याला करण्यात आलेल्या आहेत. झुवारी या ठिकाणी पेट्रोल वाहिनीला गळती लागल्याने तेथील विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणच्या विहिरी स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

स्वयंपूर्ण बाजारला देशपातळीवर नेणार

स्वयंपूर्ण बाजार ही संकल्पना राबविताना सर्वसामान्य लोकांचा विचार करण्यात आला. या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, स्वयंसहाय्य गटांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या बाजारपेठेला देशात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

नोकऱ्यांबाबत दक्ष रहा

नोकरी मिळवताना कुणीही भ्रष्टाचाराला बळी पडू नये. काही व्यक्ती वशिल्याने नोकरी मिळविण्याच्या नादात पैशांची देवाण-घेवाण करतात आणि फसतात.  स्वकर्तृत्वावर नोकरी मिळविण्यासाठी युवकांनी पुढे यावे. जर कुणी नोकरी लावतो म्हणून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास कचरणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा लोकसेवा आयोगामार्फत नोकरभरती केली जात असताना काही ठिकाणी अजूनही रिक्त जागा आहेत. त्याच्यावर सरकार लवकरच निर्णय घेऊन त्या त्वरित भरल्या जातील, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

एकलव्य योजना सुटसुटीत करणार

मेरशी येथील विष्णू गावकर यांनी आदिवासी कल्याण खात्यातर्फे एकलव्य ही योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेताना युवकांना अडचणी येत आहेत, असे सांगितले. त्यानंतर आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांना सूचना देऊन स्कॉलरशीपच्या योजना ऑनलाईन पद्धतीने सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढील वर्षाच्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने राबविल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

झुआरी पुलाची दुसरी लाईन 22 डिसेंबरला सुरू होणार

फातोर्डा येथील वैभव नाईक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की वेर्णा जंक्शनवर फ्लाय ओव्हर बांधण्याचा सरकारचा विचार आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असून, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून हिरवा कंदील आल्यानंतर ते काम मार्गी लागेल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येत्या 22 डिसेंबर रोजी झुआरी पुलाची दुसरी लेन सुरू करण्यात येणार आहे.

‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमातील सहभागी जनता

हॅलो गोंयकार या मुख्यमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. त्यापैकी चंदन लटवार (पर्वरी), आगुस्तिन डायस (पर्ये), चंदन नाईक (वझरी), अनुष्का आंयीवाले (म्हापसा), प्रशांत पाटील (फोंडा), अविनाश वेळीप (केपे), प्रभंजन किंजवडेकर (साखळी), गौरीश नाईक (वास्को), महेश परब (साखळी), सात्विक देसाई (केरी-पेडणे), जनार्दन कामत (सावईवेरे), विनीता जोशी (वास्को), श्री नाईक (पर्वरी), ऊचा कामत (वेर्णा) गोपी होबळे (मये), तनय नाईक (माशेल), संजीव नाईक (काणकोण), गोविंद देसाई (असोळणा), गुऊदास केरकर (म्हापसा), ऊपेश राऊत (सत्तरी), विनायक सावंत (रायबंदर), दामोदर प्रभुदेसाई (फोंडा), वसंत कातकर (पणजी), विष्णू नाईक (नावेली), ऊपेश नाईक (केपे), सम्राट साईरोजी (धारगळ), शिवनाथ नागेशकर (नागेशी-फोंडा) धनंजय गडेकर (पेडणे), दामोदर कामत (मळा-पणजी),  उषा गावकर (मये), जॉन फर्नांडिस (केपे) आदींनी भाग घेतला.

Advertisement
Tags :

.