कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीषण आगीत घर भस्मसात

01:22 PM Mar 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड : 

Advertisement

तालुक्यातील नांदगाव-जाखलवाडी येथे गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात झाले. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटाने आगीचा भडका उडाला. आगीत घरासह गृहोपयोगी साहित्य जळून खाक होवून लाखोंची हानी झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

Advertisement

नांदगाव-जाखलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या राजश्री दौलत खोपटकर या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या घराने पेट घेतला. रणरणत्या उन्हासह वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच सर्व गावकरी आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहचले. आग भडकत असतानाच झालेल्या शॉर्टसर्किटनंतर सिलिंडर स्फोटाने ग्रामस्थ हादरले. या स्फोटानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहचलेले ग्रामस्थही सैरावैरा धावू लागले. काही क्षणातच घर भस्मसात होवून होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत खोपटकर कुटुंबियांचा संसार उघड्यावरच पडला आहे. घराला आग लागल्याची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. खबरदारी म्हणून गावातील संपूर्ण वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.

तलाठ्यांमार्फत सायंकाळी उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. यामुळे नुकसानीसह नेमका आकडा समजू शकला नाही. आगीचे नेमके कारण समोर आले नसले तरी शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खोपटकर कुटुंबियांच्या घराला आग लागल्यानंतर इतर घरांना धोका पोहचण्याच्या शक्यतेने नजीकच्या ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर नजीकच्या घरांना पोहचणारा धोका टळल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article