For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात 1 एप्रिलपासून होणार घरांची गणना

01:10 PM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात 1 एप्रिलपासून होणार घरांची गणना
Advertisement

खोटी माहिती देणाऱ्यास हजाराचा दंड

Advertisement

पणजी : गोवा राज्यासाठी नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालयाने जनगणना 2027 कार्यक्रम अधिसूचित केला आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरांची गणना 16 एप्रिल ते 15 मे 2026 या कालावधीत होणार आहे. तत्पूर्वी 1 ते 15 एप्रिल या कालावधीत स्वेच्छेने गणना सादर करता येणार असून यासाठी विशेष खिडकी खुली केली जाणार  आहे. घरांची यादी गणनेमध्ये घरांची परिस्थिती, मुख्य सोयी-सुविधा, मालमत्ता इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे. घर मातीच्या भिंतींचे, काँक्रिटचे, घराचे छप्पर, फ्लॅट, बंगला व अन्य प्रकारांची नोंदणी होणार आहे. त्याशिवाय घरात एसी, टीव्ही, फ्रीज, इंटरनेटसह, फोन, स्मार्टफोन्स, कंप्युटर्स, लॅबटॉप अन्य सुविधा आहेत की नाही, याचीही माहिती नोंदविण्यात येणार आहे. पेयजल, वीज, शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन याचीही गणना करण्यात येणार आहे. एलपीजी, इंडक्शनची नोंद होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्ब्रुवारी 2027 मध्ये जनगणना होणार आहे. जनगणनेसाठी खोटी माहिती देणाऱ्यास ऊपये 1000 चा दंड भरावा लागणार असल्याचे सूचनेत म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.