महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चापगाव येथे घराला आग लागून नुकसान

11:14 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : चापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घराला बुधवार दि. 19 रोजी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले आहे. चापगाव येथील यल्लाप्पा मादार यांच्या घरी बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास खोलीतून धूर येत असल्याचे लक्षात आले. घरातील सर्वजण जेवण करून झोपण्याच्या तयारीत असताना अचानक घरात धूर दिसून आला. आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे घरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर आग विझविण्यासाठी माजी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश धबाले, ग्रा. पं. सदस्य नागराज यळ्ळूरकर, नजीर सनदी तसेच पिराजी मादार, शिवाजी मादार, लक्ष्मण मादार, गणपती कुऱ्हाडे, उदय पाटील, महादेव मादार, रवी मादार, ओमाण्णा मादार आदींनी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग आटोक्यात आणली.

Advertisement

यल्लापा मादार यांचे आगीमध्ये आडीच तोळे सोन्याचे दागिने, 30 हजार रुपये व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सरकारने त्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. जळालेल्या घराची पाहणी करताना लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, चांगाप्पा निलजकर, बाबू घारशी, मारुती चोपडे, नजीर सनदी, हणमंत मादार यासह महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले.  घटनास्थळी नंदगड पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article