भाग्यनगर येथे घराला आग
12:18 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : भाग्यनगर येथील घराला आग लागून गुरुवारी रात्री गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांसह दाखल होऊन पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली आहे. भाग्यनगर चौथ्या क्रॉसवरील सदानंद नार्वेकर व त्यांचे बंधू रहात असलेल्या घराला गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली आहे. शॉर्टसर्किटने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचा प्रकार उघडकीस येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्यासाठी दोन बंबांची गरज लागली. केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. यासंबंधी शुक्रवारी रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Advertisement
Advertisement