लांजामध्ये घर फोडून कॅमेऱ्यासह दुचाकीची चोरी
लांजा :
शहरातील शेवरवाडी येथे चोरट्याने घर फोडून बेडरूममधील कॅमेरा तसेच अंगणात उभी असलेली मोटारसायकल चोरून नेल्याची घटना 5 एप्रिल सायंकाळी 5 ते 8 एप्रिल सकाळी 7 वाजण्याच्या कालावधीत घडली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शेवरवाडी येथे रमाकांत मानकर यांचा प्राजक्ता नामक बंगला असून या बंगल्यात सोनल नितीन पवार (29) या भाड्याने राहतात. चोरट्याने या घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटात ठेवलेला 5 हजारांचा निकॉन कंपनीचा कॅमेरा चोरून नेला. तसेच बंगल्याचे मालक रमाकांत मानकर यांच्या बंगल्याच्या दरवाजाच्या ग्रीलचे कुलूप तोडून अंगणात उभी केलेली 10 हजार ऊपये किंमतीची हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर एक्सटेक मोटारसायकल (एमएच.08. बीडी.2668) देखील चोरून नेली.
याप्रकरणी सोनल पवार यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञाताविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले हे करत आहेत.