रेल्वेमार्गापासून काही इंचावर असलेले हॉटेल
लोक अनेकदा अन्य शहरांमध्ये हिंडण्यास जातात तेव्हा आपले हॉटेल शांतता, सुरक्षा आणि चांगले दृश्य दाखविणारे असावे अशी लोकांची इच्छा असते. परंतु जर हॉटेल रेल्वेस्थानकाच्या असेल किंवा ते रेल्वेस्थानकातच ते निर्माण करण्यात आले असेल तर तुम्ही तेथे राहणे पसंत कराल का? ब्रिटनमध्ये एका हॉटेल आणि रेस्टॉरंटची लोकेशन अशीच आहे. हे हॉटेल पाहण्यासाठी आणि येथील अनुभव घेण्यासाठी लोक दूरदूरवरून येत असतात.
हे हॉटेल एका शांत अन् छोट्या रेल्वेस्थानकाला लागून आहे. हे हॉटेल इतके नजीक आहे की ते रेल्वेस्थानकावरच निर्माण करण्यात आले असावे असे वाटू लागते. या स्टेशनपासून काही अंतरावरच रेल्वेमार्ग असून दोन्ही बाजूला रुळ आहेत. याचमुळे तेथून रेल्वे धावण्याचा आवाज ऐकू येतो.
फ्रान्सिस हा इन्स्टाग्राम यूजर रेल्वेशी निगडित कंटेंट तयार करतो, त्याला 24 लाख लोक फॉलो करतात. अलिकडेच त्याने ब्रिटनमध्ये एक अत्यंत शांत ठिकाणावरील रेल्वेस्टेशन आणि त्याच्यानजीक निर्माण करण्यात आलेल्या हॉटेलविषयी सांगितले आहे. या हॉटेलातील वास्तव्याचा अनुभव अत्यंत अनोखा आहे. कारण हे हॉटेल एका जुन्या सिग्नल बॉक्समध्ये तयार करण्यात आले आहे. सिग्नल बॉक्स अशी कॅबिन असायची, जी रेल्वे स्थानकाच्या शेजारी आजही अनेक ठिकाणी असते आणि त्याच्या आत रेल्वेचे मार्ग बदलण्यासाठी लिवर लावण्यात आलेले असतात. त्यांना मागे-पुढे करत ट्रॅक बदलला जात असतो.
स्टेशनवरील हॉटेल
व्हायरल व्हिडिओत फ्रान्सिस देखील कॉरर स्टेशन हाउसनजीक पोहोचताना दिसून येतो. स्कॉटिश हायलँडवर हे हॉटेल असून ते कॉरर स्टेशनवर निर्माण करण्यात आले आहे. फ्रान्सिस स्टेशनवर उतरताच थेट सिग्नल बॉक्सच्या दिशेने जातात आणि मग ते आत शिरतात, तेथून त्यांना रेल्वेमार्ग अत्यंत जवळ दिसून येतो. पहिल्या मजल्यावर चढून जाताच दोन्ही बाजूला रुळ दिसून येतात. रात्रीच्या वेळी एक रेल्वे देखील तेथून धडधडत जाते, तेव्हा ते सिग्नल अॅडजस्ट करण्याचा अभिनय करतात. त्यानंतर त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.
व्हिडिओ होतोय व्हायरल
या व्हिडिओला 51 लाख ह्यूज मिळाल्या असून अनेक लोकांनी त्यावर कॉमेंट केली आहे. त्या ठिकाणी केवळ रेल्वेनेच पोहोचता येते का अशी विचारणा एका युजरने केली. तर हे ठिकाण अत्यंत पसंत पडले असल्याची टिप्पणी अन्य युजरने केली आहे.