For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाटण्यात हॉटेलला आग, सहा जणांचा मृत्यू

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाटण्यात हॉटेलला आग  सहा जणांचा मृत्यू
Advertisement

45 जणांना वाचवण्यात यश : सिलिंडर स्फोटामुळे दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था /पाटणा

बिहारमधील पाटणा येथे गुऊवारी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत 7 जण अजूनही गंभीर जखमी असून त्यांच्यावर पाटण्यातील विविध ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीनंतर हॉटेलमधील 45 जणांना वाचवून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी 38 जणांना पीएमसीएच, पाटणा येथे दाखल करण्यात आले आहे. पाटणा स्टेशनजवळील पाल हॉटेल अँड रेस्टॉरंटमध्ये ही दुर्घटना घडली असून सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक चंद्रप्रकाश यांनी या भीषण घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुऊषांचा समावेश आहे. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement

पाटणा स्थानकाजवळील पाल हॉटेलला लागलेली आग आटोक्मयात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. पाटणाच्या कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या या दुर्घटनेनंतर पाटण्यात बराच वेळ गोंधळ उडाला होता. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. हॉटेलमध्ये अडकलेल्यांना हायड्रोलिक व्रेन आणि फायर इंजिनने बाहेर काढण्यात आले. तसेच अग्निशमन दलाच्या पाच मोठ्या क्रेन घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. त्याशिवाय आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तासन्तास परिश्रम घेत होत्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविल्याचे अग्निशमन दलाच्या प्रमुख शोभा अहोटकर यांनी सांगितले. जोरदार वारा वाहत असल्याने आग खूप भयानक होती. आग आजूबाजूच्या भागात पसरू नये म्हणून खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.