गोवावेस येथे हॉटेलला आग लागून लाखोंचे नुकसान
शॉर्टसर्किटमुळे साहित्याने घेतला पेट
बेळगाव : गोवावेस येथे एका हॉटेलला आग लागल्याची घटना गुऊवारी मध्यरात्री घडली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत हॉटेलमधील सर्व साहित्य फर्निचर तसेच टेबल खुर्च्या यांचे नुकसान झाले. लाखो ऊपयांचे हॉटेलचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन जवानांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्मयात आणण्यात आली. जलतरण तलावाजवळील हॉटेल अनुग्रह येथे गुऊवारी रात्री तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणातच ही आग संपूर्ण हॉटेलमध्ये पसरल्याने साहित्य जळण्याचा मोठा आवाज येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी या आवाजामुळे हॉटेलचे मालक सुधाकर पुजारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आग लागण्याची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला दिली. हॉटेलमधील फर्निचर तसेच टेबल खुर्च्या आगीमध्ये जळून खाक झाल्या. इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाचे ठाणाधिकारी शिवाजी कोरवी व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला. धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग विझवताना अडचणी येत होत्या. हॉटेलमधील इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळत असल्याने आग आटोक्मयात आणण्यात विलंब झाला. तब्बल दोन तास अग्निशमन विभागाचे दोन बंब आग विझवण्यामध्ये कार्यरत होते. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्मयात आली.