भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाला लुटल्या प्रकरणी ५ जणांचा शोध
गुन्ह्यातील चारचाकी, रिक्षा एकडा जप्त
कोल्हापूर
हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला निर्जनस्थळी नेऊन लुटल्या प्रकरणातील चारचाकी, रिक्षा आणि एक दुचाकी पोलिसांनी रविवारी जप्त केली. तर या प्रकरणात वापरण्यात आलेला एडकाही जप्त केला. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या ५ जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हॉटेल व्यावसायिक अक्षय देशपांडे याचे ५ ते ६ जणांनी अपहरण करून लुटण्याचा प्रयत्न केला होता. अक्षयला शुक्रवारी रात्री एका वाहनातुन निर्जनस्थळी नेऊन त्याला बेदम मारहाण करत त्याच्याकडील दिड तोळ्याची अंगठी, तीन तोळ्यांचा सोन्याचा गोफ काढून घेतला होता. यानंतर अक्षयने आपली सुटका करून, जखमी अवस्थेत याबाबतची फिर्याद शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर शाहुपूरी पोलिसांनी आकाश उर्फ आकु अनिल साळुंखे, विशाल उर्फ सर्किट अनिल साळुंखे, युवराज सुरज मोडीकर, प्रणित राजेंद्र मगदूम, विकेश वसंत मुल्ला, या पाच जणांना अटक केली होती. तर सोहेल उर्फ बॉब मुल्या, हर्षल नार्वेकर, प्रथमेश मेढे, वैभव सुर्यवंशी, मन्सूर शेख यांचा शोध सुरू आहे.