Kolhapur News : अंबप फाटा येथे जंगली प्राण्याकडून घोड्यावर हल्ला
बिबट्या बाबत वनविभाग साशंकता
अंबप : हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा येथील सदगुरु जंगलीदास महाराज आश्रमाजवळील शेतवस्तीवर शुभम सिद्धू वाघमोडे यांच्या पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला असून यामध्ये घोडा गंभीर जखमी झाला तर येथूनच जवळ असलेल्या मेंढपाळाचे मेंढीचे पिल्लूही पळवले आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
अंबप फाटा येथून जवळच असणाऱ्या माळावर वाघमोडे कुटुंब राहते त्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत यापैकी पाळीव घोड्यावर बिबट्या सदृश्य प्राण्याने प्राण घातक हल्ला केला. यामध्ये घोडा जखमी झाला असून तेथून जवळच काही अंतरावर. येथील मेंढपाळ अनिल हिरवे यांच्या मेंढ्या बसण्यासाठी आहेत त्यातील एक महिन्याच्या बकऱ्याला तो प्राणी घेऊन गेला असल्याची माहिती मेंढपाळ यांनी दिली.
सदर घटनेची माहिती सरपंच दीप्ती माने सोमवारी सकाळी मिळतातच पशुधन अधिकारी डॉ. आरती दांडगे, पशुसेवक डॉ. संदीप चोपडे यांना बोलवून घोड्यावर उपचार करण्यात आले. वनविभागाच्या वनरक्षक श्रद्धा सोनटक्के यांनी सदर घटनास्थळी पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी बिबट्याने हल्ला केला असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला मात्र वन विभाग याला दुजोरा देण्यास तयार नाही.
मेंढी पळवणारा व घोड्यावर प्राण घातक हल्ला करणारा बिबट्या नाही तर दुसरा कोणता प्राणी असू शकतो याबाबत नागरिकांच्यात चर्चा होती.. यावेळी विकासराव माने अंबपचे उपसरपंच असिफ मुल्ला पत्रकार प्रकाश कांबळे सुरेश वाघमोडे प्रमोद सूर्यवंशी लखन दाभाडे सचिन दाभाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते