‘४१८’ चित्रपटाचा हॉरर थ्रिलरपट ट्रेलर
प्रशांत नीलकडून सादर करण्यात आलेला हॉरर थ्रिलरपट ‘418’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात एका इमारतीतून होते, ज्याच्या रुम क्रमांक 418 मध्ये देविकाचा आत्मा वास करत असते. हा आत्मा या इमारतीत कुणालाच राहू देत नाही, खासकरून मुलींना. ट्रेलरमध्ये जी मुलगी या इमारतीत येईल ती कधीच परतू शकणार नाही अशा स्वरुपाचा संवाद आहे. ही देविका कोण? तिची कहाणी काय आणि ती लोकांना का मारत आहे या प्रश्नाची उत्तरे ट्रेलर पाहून मिळत नाहीत. चित्रपट पाहिल्यावरच हे कोडं उलगडू शकणार आहे. चित्रपटात चैत्रा आचार, सूर्या राज, चरण लक्करजू, प्रीति पगाडाला आणि शशांक पाटील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात चैत्राने देविकाची भूमिका साकारली आहे. ‘418’द्वारे कीर्तन नागगौडा यांनी दिग्दर्शक म्हणून स्वत:च्या कारकीर्दीस सुरुवात केली आहे. हा हॉरर थ्रिलरपट 23 ऑक्टोबर रोजी तेलगू, हिंदी, कन्नड, तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
