For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मदुराईत भीषण रस्ते दुर्घटना, एकाच परिवारातील 5 जण ठार

10:42 PM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मदुराईत भीषण रस्ते दुर्घटना  एकाच परिवारातील 5 जण ठार
Advertisement

अनेक वाहने परस्परांना धडकली

Advertisement

वृत्तसंस्था

मदुराई

Advertisement

तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात सोमवारी एका भीषण रस्ते दुर्घटनेत चेन्नईतील एकाच परिवारातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामंध्ये एक 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एक कार अनियंत्रित होत दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे.

मेलूरनजीक थुम्बैपटी येथील चारपदरी मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. चेन्नईहून तिरुनेलवेलीच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून पाच जण प्रवास करत होते. एका दुचाकीला टक्कर मारल्यावर कार चालकाने वाहनावरील नियंत्रण गमाविले होते. यानंतर कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गिकेत पोहोचली हाहेती. याचदरम्यान समोरून येणाऱ्या कारशी तिची जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत कारमधील 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चेन्नईतील मडिपक्कम येथील श्रीमन, राजकुमारी, रंजा आणि प्रणिका अशी मृतांची नावे आहेत. चारही जण एकाच परिवाराचे सदस्य आहेत, तर परिवारासोबत प्रवास करणाऱ्या पाचव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

Advertisement
Tags :

.