अमेरिकेत भीषण कार दुर्घटना, 3 भारतीयांचा मृत्यू
कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एका रस्ते दुर्घटनेत हैदराबाद येथील एका परिवाराच्या तीन सदस्यांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय प्रवास करत असलेली कार अन्य वाहनाला धडकल्याने ही दुर्घटना घडली होती. नाजिया सलमा, त्यांची मुलगी अन् मुलगा या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. तर नाजिया यांचे पती शेख नवेद आणि त्यांची छोटी मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेख नवेद सुमारे 10 वर्षांपूर्वी सैदाबाद येथून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. अमेरिकेत परिवारासोबत प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. नवेद यांचे पिता शेख अब्दुल सईद यांना अमेरिकेतील पोलिसांकडून दुर्घटनेविषयी माहिती मिळाली. सईद यांनी परिवाराच्या अन्य सदस्यांना अमेरिकेत जाण्यासाठी इमर्जन्सी व्हिसा जारी करावा असे आवाहन विदेशमंत्री एस. जयशंकर यांना केले आहे.