For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव–गोवा मार्गावर भीषण अपघात; कार थेट टिप्परखाली, युवकाचा जागीच मृत्यू

10:04 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव–गोवा मार्गावर भीषण अपघात  कार थेट टिप्परखाली  युवकाचा जागीच मृत्यू
Advertisement

बेळगाव : बेळगावहून गोव्याच्या दिशेने एम-सॅंड वाहतूक करणाऱ्या टिप्परला समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी, सायंकाळी 7 वा. GA 04 T 8192 क्रमांकाचा एम-सॅंड वाहतूक करणारा टिप्पर बेळगावहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बेळगावातील KA 22 MA 5226 क्रमांकाच्या कारने टिप्परला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार थेट टिप्परखाली घुसली.

या अपघातात कारमधील युवक गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करण्यात आले.

Advertisement

अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत युवकाची ओळख तसेच अपघाताबाबतचा अधिकृत तपशील पोलिसांकडून मिळणे बाकी आहे.

Advertisement
Tags :

.