For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Bengaluru Highway | पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी

12:20 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pune bengaluru highway   पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात  दोघांचा जागीच मृत्यू  पाच जण जखमी
Advertisement

कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या मिनी बसची आणि ट्रकची धडक

Advertisement

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील डिमार्टसमोर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या मिनी बसची आणि ट्रकची धडक झाल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की मिनी बसचे मोठे नुकसान झाले.

या दुर्घटनेत स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी बचावकार्य राबवत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.