पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; पेठनाका येथे भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू!
ईश्वरपूर पेठनाका, भरधाव कारची धडक, दुचाकीस्वार ठार
ईश्वरपूर -बेंगलोर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पेठनाका येथे भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या बहकेत दुचाकीरवार विशाल हरिशचंद्र काळबागे (३७ रा. चिखलगोठण ता. तासगाव) हा ठार झाला. हा अपघात रविवार २९ मार्च रोजी ११ च्या सुमारास घडला.
विशाल काळबागे हा पल्लार क्रमांक एमएच १० सीसी ८१६२ या दुचाकीवरून पेठ हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून कराडकडे जात होता. त्यावेळी चारचाकी इको गाडी क्रमांक एमएच १२ ईसी १३२७ यावाहनाने भरधाव वेगात येत जो-राची धडक दिली. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला. अ-पघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी बाह-नाथा चालक सोमनाथ साबळे याच्याविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर हरिशचंद्र काळबागे (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.