For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shahuwadi accident | शाहूवाडी तालुक्यात भीषण अपघात! मलकापूर-कोपार्डे मार्गावर दोन दुचाकींची धडक; तरुण जागीच ठार

01:15 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
shahuwadi accident   शाहूवाडी तालुक्यात भीषण अपघात  मलकापूर कोपार्डे मार्गावर दोन दुचाकींची धडक  तरुण जागीच ठार
Advertisement

            शिरगावचा ३४ वर्षीय तरुण अपघातात दगावला

Advertisement

शाहूवाडी : मलकापूर ते कोपार्डे मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. किरण भगवान पोतदार (वय ३४ शिरगाव ता. शाहूवाडी) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची शाहूवाडी पोलिसात रात्री उशिरा नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्यामाहितीनुसार किरण पोतदार हा आपल्या दुचाकीवरून शिरगावकडे जात होता. तर त्याच दरम्यान शिरगावकडून मलकापूरच्या दिशेने दुचाकी येत होती. या दोन्ही दुचाकीची कोपर्डे येथे समोरासमोर जोराची धडकझाली.

या अपघातात किरण पोतदार यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले जखमींना तत्काळ मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.
मयत किरण पोद्दार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.