For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशामध्ये भीषण अपघात; ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू

01:53 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
ओडिशामध्ये भीषण अपघात  ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातील NH-20 वरती झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. उभ्या असलेल्या ट्रकला प्रवासी व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

Advertisement

पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा घाटगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला जखमींना घाटगाव रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चक्काचूर झाला आहे.माहिती मिळताच बळीजोडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.