राशी भविष्य २०२६-वृश्चिक

मो: 9611663465
वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते. भावनिक, शक्तिशाली आणि धाडसी असतात. त्यांना मूर्ख बनवणे सोपे नसते, म्हणून कोणीही त्यांना फसवू शकत नाही. या राशीचे लोक नेहमीच योग्य सल्ला देण्यावर विश्वास ठेवतात. वैविध्याची आवड असते. कमी बोलतात, परंतु त्यांच्या बोलण्याने सर्वांना प्रभावित करतात. जीवनसाथीशी एकनिष्ठ असतात, कुटुंबातील त्यांच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात. महत्त्वाकांक्षी आणि हट्टी असतात. ते स्वत:चा मार्ग अवलंबतात, इतरांचा हस्तक्षेप आवडत नाही.
वृश्चिक राशीचे लोक आपले काम पूर्ण समर्पणाने करतात. बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते. यांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते. हे लोक त्यांच्या आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत. विश्वासार्ह मित्र एकनिष्ठ भागीदार असल्याचे सिद्ध करतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांचे काम पूर्ण ऊर्जा, आत्मविश्वास आणि समर्पणाने करतात. मैत्री आणि शत्रुत्त्व दोन्ही कट्टरपणे निभावतात. बदला घेण्याची आणि प्रतिशोधाची इच्छा असते. त्यांच्यातील आश्चर्यकारक उर्जा शक्ती आणि रहस्यमय डोळे त्यांच्या सभोवतालच्या लोकांना संमोहित करतात. ते प्रखर, वर्चस्व, क्रूर आणि वचनबद्ध असतात. त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेने, संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील लढाया लढण्याची सवय आहे. नक्कीच ते मैत्रीपूर्ण किंवा उदार नाहीत परंतु ते स्वत:च्या फायद्यासाठी हेराफेरी करणारे किंवा षडयंत्र करणारेही नाहीत. ते अत्यंत उत्साही आणि भावनिक असतात. ते संधींचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम आहेत आणि आजच्या तोट्याचे उद्याच्या नफ्यात रूपांतर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वत:चे वर्चस्व कायम ठेवतात. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते. वृश्चिक राशीच्या लोकांचा हेतू खूप पक्का असतो. एकदा काम करायचे ठरवले की ते पूर्ण करतातच.
हे लोक इतरांच्या विचारांना विरोध करतात. यामुळे ते सर्वांशी सहज मिसळत नाहीत. हे लोक कधीकधी त्यांच्या जवळच्या लोकांचा देखील हेवा करतात. वृश्चिक राशीचे लोक पटकन आपला मार्ग बदलतात आणि त्यांना आवडेल त्या मार्गाकडे जातात. या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते. या राशीच्या व्यक्ती बहाद्दूर तसेच भावुकही असतात. या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहजसोपे नसते. या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही. या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात. या राशीच्या व्यक्ती स्वत:चे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात.
ग्रहमान
वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. मिथुनेचा अष्टमात गुरु तितकासा शुभकारक नाही. अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण करू शकतो. प्रॉपर्टीचे मॅटर्स कटकट निर्माण करू शकतील. मात्र एक जून नंतर भाग्यात जाणारा गुरु आणि त्यानंतर कर्मस्थानी जाणारा गुरु हे दोन्ही गुरूंचे भ्रमण आपल्यासाठी अतिशय शुभकार्य करणार आहेत. अचानक धनलाभ. यशाच्या मार्गातील अडचणी आपोआप कमी होत जाणार. त्यामुळे सर्व कामांमध्ये आपल्याला लाभ आणि यश हमखास. त्या पुढील कालखंडात कोणतेही काम कमी कष्टात जास्त उत्पन्न देणारे आहे. आपल्या हातून धार्मिक कार्यसुद्धा घडल्याचा आपल्याला आनंद लाभणार आहे.
मीनेचा शनी पंचमात राहणार आहे. हा शनी कमी जास्ती शुभकारक राहणार आहे. शेअर मार्केट, सट्टा वायदे बाजारमध्ये पैसे न गुंतवलेले बरे. सरळ मार्गाने गेल्यास आर्थिक नुकसान होणार नाही. जवळजवळ 25 नोव्हेंबर पर्यंत राहू तुमच्या चतुर्थस्थानात राहील. हा राहू तितकासा शुभ नाही. आईच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. घरासंबंधी काही कटकटी निर्माण होऊ शकतात. अशुभ शक्तीचा प्रभाव किंवा त्रास आपल्यावर पडू शकतो एकंदरीत घरावर वाईट छाया राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या घराची खरेदी विक्री करायची असल्यास यावर्षी न केलेली बरी. शेती बागायतीपासून मात्र आपल्याला लाभ होणार आहे. वाहन सावकाश चालवा. वर्षभर केतू दहावा म्हणजे कर्मस्थानी राहणार आहे. हा केतू आपल्यासाठी शुभकारक राहणार आहे. कामाच्या ठिकाणी छोटे-मोठे अडचणी निर्माण होऊ शकतील. पण या केतूमुळे अशुभकारक असं काही घडणार नाही. तुम्हाला या वर्षी स्वास्थ्याला घेऊन पूर्णत: सावधान रहावे लागेल सोबतच, आपल्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि आपल्या रुटीनमध्ये बदल करावा लागेल तेव्हाच तुम्ही तुमचे स्वास्थ्य चांगले ठेऊ शकाल.
नोकरदार
उत्तरार्धात दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास नफा होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी मतभेद झाले असतील तर ते वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. सुरुवातीला एखाद्या विशिष्ट कामाबद्दल मन चिंतेत असेल, करिअर आणि व्यवसायात मंद गतीने प्रगती दिसून येते. वर्षाच्या मध्यापासून पुन्हा एकदा शुभेच्छांचा आधार मिळू लागेल आणि तुमच्या इच्छेनुसार गोष्टी घडू लागतील. या काळात आरोग्य आणि नातेसंबंधांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल. कुटुंबात कोणताही निर्णय घेताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाशी संबंधित असाल तर शॉर्टकटद्वारे नफा मिळवणे टाळा आणि चुकूनही नियमांकडे दुर्लक्ष करू नका. कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा अनावश्यक त्रासांना सामोरे जावे लागेल. तुम्ही आराम आणि विलासिता संबंधित गोष्टींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. या काळात, करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि नफा होईल. अचानक येणारी कोणतीही मोठी समस्या चिंतेचे मोठे कारण बनू शकते. या काळात, आपल्या कामात निष्काळजीपणा टाळावा लागेल. आरोग्याच्या आणि नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातूनही हा काळ थोडा प्रतिकूल राहणार आहे. पुढील अस्वस्थता टाळण्यासाठी एखाद्या प्रिय व्यक्तीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. वर्षाच्या मध्यात, जीवन पुन्हा एकदा रुळावर येताना दिसेल. या काळात, नियोजित कामे चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. या काळात धार्मिक व्यक्तीचा सहवास मिळेल. कुठूनतरी अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्ता खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल. कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होईल. बोलण्यावर आणि वागण्यावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. लोकांशी समन्वय राखणे तुमच्यासाठी चांगले राहील. आशावादी रहा आणि चांगल्या बाजूकडे लक्ष द्या.
स्त्री वर्ग
प्रेमसंबंधांमध्ये अंतर आणि गैरसमज असू शकतात. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकणार नाही. तुमच्या जोडीदाराला तुमच्या दु:खाबद्दल वाईट वाटू शकते. विवाहित लोकांच्या नात्यात संवादाचा अभाव असू शकतो. मानसिक गोंधळामुळे नात्यात पारदर्शकता ठेवण्यात अडथळे येतील. सहकाऱ्यांसोबत वाद किंवा मतभेद नको. धीर धरा. तुमच्या योजनांनुसार एकत्र काम करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. स्त्राrरोगविषयक समस्या उद्भवू शकतात. संसर्गापासून स्वत:चे रक्षण करा. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वैयक्तिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये व्यस्त राहणे चांगले. नोकरी करणाऱ्या महिलांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कोणत्याही प्रकल्पाबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी वाद होणार नाही याची खात्री करा.
अॅलर्जीमुळे घसा खवखवणे आणि खोकला-सर्दी सारखी समस्या उद्भवू शकते. अजिबात निष्काळजी राहू नका, ताबडतोब उपचार घ्या. थकवादेखील जाणवू शकतो. नियमित आरोग्य तपासणी करत रहा. जीवनसत्त्वे किंवा खनिजांची कमतरता असू शकते. वाहन काळजीपूर्वक चालवा. महिलांना कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. भावंडांशी वाद टाळा. जून नंतर, जेव्हा देवगुरू गुरू राशीतून नव्या घरात भ्रमण करेल, तेव्हा आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळेल. जून पर्यंतच्या काळात, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आणि नोकरीत विशेषत: सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या कामात निष्काळजी राहू नका अन्यथा भविष्यात प्रतिकूल परिस्थितीच्या रूपात तुमच्या करिअरवर त्याचा परिणाम होईल. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. पैशाचा ओघ मिश्रित असेल. वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मुलांच्या प्रगतीबद्दल तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. दानधर्म होणार आहे. एक जूननंतर विवाहासाठी आपल्याला गुरुबळ सुरू होणार आहे. एकंदरीत गुरु एक जूननंतर शुभकारक राहणार आहे.
विद्यार्थी
विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल. सरकारी परीक्षांमध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. स्पर्धात्मक परीक्षांचा निकाल जवळच्या काळात आला तर तुमच्यासाठी अपेक्षेपेक्षा चांगला असू शकतो. शिक्षकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अभ्यासासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रयत्न अधिक तीव्र करावेत. कठोर परिश्रमाने तुम्ही योग्य पद मिळवू शकाल. तुम्हाला मिळणारे परिणाम कधी कधी कमजोर राहू शकतात कारण, या वर्षी तुमचे स्वास्थ्य नाजूक राहण्याची शक्यता आहे.
- राशीस्वामी - मंगळ
- शुभवार - मंगळवार
- अशुभ वार - शुक्रवार
- घात मास - आश्विन
- शुभ रंग - लाल
- भाग्यरत्न - पोवळा
- आराध्य देवता - श्री गणेश व श्री दुर्गादेवी