राशिभविष्य खजाना
काउंट डाउन-2 (नव वर्ष प्रासंगिक)
शिवस्वरोदय शास्त्राबद्दल लिहीत असताना मला कायम असे वाटत आले आहे जसे की, आपल्या घरी वायरिंग पूर्ण झालेले आहे, लाईट आहे, बाकीची सगळी उपकरणे आहेत. पण आपल्याला बटन कसे लावायचे हेच माहीत नाही! म्हणजे सगळी व्यवस्था असून सुद्धा, आपल्याकडे ती शक्ती असून सुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही आणि त्यामुळे या विषयावरती लिहायचे, असे मी ठरवले. नंतर कळले की, बऱ्याच ठिकाणी व आंतरजालावरती स्वर विज्ञान, शिवस्वरोदय शास्त्र इत्यादी वरती कोर्सेस घेतले जात आहेत. ज्यांना या शास्त्राबद्दल अगोदरच माहिती आहे, त्यांना काही अॅडिशनल माहिती या लेखमालेतून मिळेल. ज्यांना अजिबात काही माहीत नाही त्यांना अद्भुत शास्त्राची महती कळेल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझे जे लेख आहेत त्यामध्ये अशी कोणतीही माहिती नसेल ज्यामुळे तुम्हाला कुठलाही धोका होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बिनधास्त याचा प्रयोग करू शकता! इतर ठिकाणची माहिती प्रयोग करण्यापूर्वी सावध राहणे गरजेचे आहे. कारण मी 2010 साली याचे परिणाम स्वत: भोगलेले आहेत. हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेले असताना प्रासंगिक म्हणून मला काही माहिती द्यावीशी वाटते. शिवस्वरोदय शास्त्राबद्दल ही प्रासंगिक लेखमाला, हे 4 लेख संपल्यावर पुन्हा सुऊवात करण्यात येईल. (नवीन वर्षाचे गिफ्ट देतोय तुम्हाला!) सुज्ञ वाचकांच्या हे लक्षात आले असेल की, येणाऱ्या दोन बुधवारी येणारे वर्ष चांगले कसे करावे? याबद्दल चर्चा असेल, नंतरच्या दोन बुधवार नंतर काही यंत्रांचा उपयोग कसा करायचा ते सांगितले जाईल. पण या लेखाला सुऊवात करायच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की, शिवस्वरोदय शास्त्र जे अत्यंत दुर्मिळ आणि प्रॅक्टिकली त्याचा उपयोग कसा करावा याच्याबद्दल आपले जे डिस्कशन चालू आहे ते चालूच राहील. हे लेख प्रासंगिक आहेत पण महत्त्वाचे आहेत म्हणून लेखमालेच्यामध्ये या लेखांना आवर्जून घेतलेले आहे. तुम्ही टीव्हीवर इतर ठिकाणी पॅलेंडरवर हे वर्ष कसे जाईल? त्याच्याबद्दल डिस्कशन वाचले असेल किंवा ऐकले/बघितले असेल. संपूर्ण देशाला हे वर्ष कसे जाईल? हे ज्योतिषशास्त्राrयदृष्ट्या सांगण्याचे काम अत्यंत क्लिष्ट असते. याला ‘मेदिनीय ज्योतिष’ असे नाव आहे. ज्याला इंग्रजीत मुंडेन एस्ट्रोलॉजी, असे म्हणतात. मुळात भारताची रास कुठली? उत्तर भारतीय ज्योतिषी (जसे के. एन. राव सर) भारताची रास मकर अशी मानतात. दक्षिणेकडे ज्योतिषांनी (जसे बी. व्ही. रामण सर) भारताची रास कन्या अशी मानली आहे. उत्तर भारतीयांच्या मते, वराह मिहिरांच्या ब्रुहत सुत्रामध्ये भारताची रास मकर असे उल्लेख केले आहे. पण वराह मिहिरांच्या या ग्रंथांमध्ये कुठलाही श्लोक असा नाही की जो सांगेल की भारताची रास मकर आहे. मुळात कूर्मचक्र या प्रकाराचा उपयोग संहिता या ज्योतिषशास्त्रातल्या शाखेमध्ये केला जातो. या कूर्मचक्राचा उल्लेख वराह मिहीर यांच्याबरोबरच विष्णू पुराणामध्येही आढळतो. या चक्रामध्ये उत्तरेकडील भागामध्ये मकर रास असल्याने उत्तरेकडील ज्योतिषी भारताची रास मकर मानतात आणि दक्षिणेकडील ज्योतिषी दक्षिणेकडे कन्या रास आल्याने कन्या मानतात. हे वर्ष कसे असेल? थोडक्मयात सांगायचे तर, 2025 या चालू वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण अनिश्चित असेल, ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतूचक्र ढासळल्याने कित्येक ठिकाणी पावसाचे अतिप्रमाण अनुभवायला येईल जे पिकांकरता तितकेसे अनुकूल नसेल. चक्री वादळांची संख्या वाढेल. आगीच्या घटना वाढतील. ऊस लागवड करणाऱ्यांना थोडे नुकसान होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे त्यांनी हवामानाचा योग्य अंदाज घेऊन मग निर्णय घ्यावे. यावर्षी साखर निर्मिती कारखान्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव होण्याची शक्मयता आहे. धान्याच्या बाबतीत काळजी करण्यासारखे कारण नाही. व्यापाऱ्यांना जागतिक परिस्थितीचा फटका बसण्याची शक्मयता आहे. कापड व्यापाऱ्यांना वर्षाच्या मध्ये आणि शेवटी नफा जास्त होण्याची शक्मयता आहे. सोन्याचे भाव भरमसाठ वाढतील. सरकारी धोरण जास्त अनुकूल असले तरी मोठे आणि मध्यम फसवणुकीचे व्यवहार घडतील. यावर्षी कट्टर लोकांमध्ये आणि इतरांमध्ये संघर्षाची ठिणगी जास्त पडलेली दिसून येईल. राजकारणात अनपेक्षित घटना घडतील. घातपात-अपघातांची संख्या वाढेल. लोकांची सहनशक्ती कमी होईल. घटस्फोट आणि हिंसा वाढलेली दिसेल. चैनीच्या वस्तू आणि व्यसनाधीनता यांच्या चक्रात तऊण पिढी वाया जाऊ नये, याची काळजी आपल्याला घ्यायला हवी. कारण यावर्षी व्यसन लागले तर ते कधीही सुटणार नाही. जुलै-ऑगस्टनंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकार विरोधी आंदोलने होऊ शकतात. साधारण याच वेळेला अपघात आणि घातपात यांचे प्रमाण वाढेल. शेजारील राष्ट्रांमध्ये मोठ्या घटना घडतील आणि त्यांची परिस्थिती अवघड होईल. भारताचा जीडीपी सुधारेल आणि आपल्या भारताने समृद्धीच्या दिशेने आणखीन एक पाऊल टाकले, असे समाधान मिळेल.
मेष
घरातील बदलांशी संबंधित योजना बनवता येतील. तणावमुक्त वाटेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी शक्मयता निर्माण होत आहे. वादग्रस्त गोष्टींपासून दूर रहा. कारण यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. पण तुम्हीही चांगली कामगिरी कराल. वाहन जपून वापरा. अजिबात न वापरल्यास बरे होईल.
उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.
वृषभ
सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात आपली उपस्थिती जाणवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या मुलाला करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत मित्रांकडून योग्य सल्ला आणि मदत मिळेल. तुमचा ताणही दूर होईल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत घाबरण्याऐवजी संयमाने त्यावर उपाय शोधा.
उपाय : खोटे केव्हाही बोलू नका.
मिथुन
विद्यार्थी व युवकांनी चुकीच्या संगतीपासून व सवयींपासून दूर रहावे. अन्यथा त्याचा तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. काहीवेळा, जास्त कामाच्या ओझ्यामुळे स्वभावात चिडचिड होऊ शकते. बहुतेक काम वेळेवर व्यवस्थित झाल्यास तुम्हाला आनंद वाटेल. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाशी संबंधित योजनाही बनवल्या जातील. अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या.
उपाय : खोटी साक्ष देऊ नका.
कर्क
एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मदत मिळाल्यानंतर तऊणांना खूप आनंद वाटेल. वैयक्तिक कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. जर वैयक्तिक कामाचे नियोजन केले असेल तर या आठवड्यात ते त्वरित अंमलात आणणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थी आणि तऊणांना त्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल.
उपाय : वटवृक्षाला पाणी टाका.
सिंह
भावनिकता आणि निष्काळजीपणा यासारख्या कमकुवतपणावर मात करा. चुका टाळण्यासाठी, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी पुनर्विचार करणे चांगले होईल. विचार न करता इतरांवर विश्वास ठेवणे योग्य नाही. हृदयाऐवजी डोके लावून काम करा. थोडी काळजी घेतल्यास तुमची सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने होतील. उच्च अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल.
उपाय : दुर्गा पूजा करा.
कन्या
जास्त धावपळ केल्याने थकवा आणि डोकेदुखी जाणवेल. निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवल्याने ताजेतवाने वाटेल. एक पद्धतशीर दिनचर्या असेल आणि कलात्मक आणि मनोरंजक कामात विशेष वेळ घालवला जाईल आणि तुम्हाला खूप उत्साही वाटेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहाशी संबंधित संबंध येऊ शकतात. कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : गोड खाऊन बाहेर पडा.
तूळ
वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि घरातील वातावरणही सौहार्दपूर्ण राहील. विवाहबाह्य प्रेमसंबंधांपासून अंतर ठेवा. अथक प्रयत्नांमुळे तुम्हाला या काळात तुमच्या कोणत्याही समस्येचे निराकरण मिळेल. वरिष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन जरूर पाळा, त्याचा नक्कीच फायदा होईल. वाढत्या खर्चामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता, त्यामुळे ते कमी करा आणि तुमच्या बजेटची काळजी घ्या.
उपाय : रात्री दूध पिऊ नका.
वृश्चिक
अहंकार आणि हट्टीपणामुळे जवळच्या नातेवाईकांशी काही मतभेद होऊ शकतात. काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून या आठवड्यात थोडा आराम मिळेल. आत्मनिरीक्षण करण्यात थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला तुमची अनेक अवघड कामे आयोजित करण्याची संधी मिळेल. धीराने काम केल्यास तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल. शक्मय असेल तर ससे पाळा.
उपाय : सदाचाराला महत्व द्या.
धनु
आरोग्य काहीसे कमजोर राहील. सध्याच्या वातावरणापासून स्वत:चे संरक्षण करण्याचे सुनिश्चित करा. सर्व प्रकारचे संबंध सुधारतील. काम प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळेल. घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित कामातही वेळ जाईल. कधीकधी तुमची शंका घेण्याची प्रवृत्ती तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनते.
उपाय : जुगार इत्यादी खेळणे पूर्णत: टाळा.
मकर
मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यप्रणाली सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न चांगले परिणाम देतील आणि सामाजिक आणि कौटुंबिक प्रशंसा देखील करतील. मित्रांसोबत पॉझिटिव्ह चर्चा होईल. नातेसंबंधही घनिष्ठ होतील. छोट्या-छोट्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी तुमच्या कामात व्यस्त रहा. अॅसिडिटीसारख्या समस्या वाढतील.
उपाय : मंदिरात जाण्याचा परिपाठ ठेवा.
कुंभ
यश मिळण्याची शक्मयता आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची सखोल माहिती घ्या. सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात आनंददायी वेळ जाईल. नकारात्मक प्रवृत्ती असलेले काही लोक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाकडेही उघड करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होईल. उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. नोकरदार लोकांनी सावध रहावे.
उपाय : माशांना तांदूळ द्या.
मीन
एखादी चांगली बातमी मिळाल्याने संपूर्ण आठवडा आनंददायी जाईल. जर जागा बदलण्याची इच्छा असेल, तर या उपक्रमांच्या नियोजनासाठी वेळ खूप अनुकूल आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आशा आणि मेहनतीचे योग्य फळही मिळेल. काही षड्यंत्राचे बळी होऊ शकता, त्यामुळे नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा.
उपाय : तीर्थयात्रा करा.