For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:05 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

आपण घाबरतो... गावगुंड पुढाऱ्यापासून गल्लीतल्या कुत्र्याला, गाडी चालवत असताना उभ्या असलेल्या टोपीवाल्याला, आवाज चढवणाऱ्या शेजाऱ्यांपासून हलतडुलत चालणाऱ्या बेवड्याला, काळ्या कोटापासून ते पांढऱ्या कोटाला, खाकीतल्या संरक्षकापासून हे गल्लीत पाणी सोडायला आलेल्या माणसाला आणि हे आपण घाबरतो ते आपण काही चुकीचे केले आहे म्हणून नाही तर घाबरणे ही आपली वृत्ती झालेली आहे. अशात हे सगळे कमी म्हणून की काय आकाशातल्या ग्रहांनादेखील आपण घाबरतो. सध्याचा सोशल मीडियावरचा टेंड बघितला तर सगळे रील्सवाले, चॅनलवाले 29 मार्चला होणाऱ्या शनि बदलाला अशा काही स्वरूपात प्रेझेंट करत आहेत की, सामान्य माणूस तर सोडा, ज्याला ज्योतिषाचे थोडेफार कळते तो देखील विचार करायला भाग पडतोय की आपले आता काय होईल? जरा काही झाले की दे शनिला दोष हा प्रकार आहे. मग गल्लाभरू ज्योतिषी शांती करा, हवन करा, सांगून आपले पितळ चमकावतात. प्रत्येक ग्रहाची एक गती आहे. ज्या गतीने तो राशी बदल करत असतो. चंद्राला साधारणपणे सव्वा दोन दिवस लागतात, सूर्याला एक महिना लागतो, बुधाला 14 दिवसापासून 30 दिवस लागतात. शुक्राला 23 दिवस ते दोन महिने लागू शकतात. मंगळाला 57 दिवस लागतात, गुऊला एक वर्ष लागते आणि शनिला साधारण अडीच वर्ष काळ लागतो. एका राशीतून भ्रमण करण्याकरता. सगळेच ग्रह जर राशी बदल करत असतील तर आपण शनि महाराजांना इतके का घाबरतो? राहू/केतू, मंगळ यांचे राशी बदल देखील उत्पात माजवतात. मंगळच्या राशी बदलाला तरी शस्त्रक्रिया, अपघात, युद्ध, हिंसा, सेपरेशन याच्याशी जोडले गेले आहे. चंद्र मानसिक बदल दाखवतो, सूर्यामुळे मान-अपमान होतात, बुधामुळे तरी बुद्धी भ्रमीत होते, राहू अचानक राजाचा रंक करतो. केतू मोहमायेच्या जंजाळापासून सोडवण्याकरता जबरदस्त थप्पडा देतो. मग शनिच्या राशी बदलाचा इतका बाऊ का? शनि जिथे जातो तिथे तो विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी जागतिक लक्ष वेधून घेतो. सामूहिक प्रयत्नांद्वारे, आपण त्या क्षेत्रातील समस्या सोडवतो. उदाहरणार्थ, जेव्हा शनि कुंभ राशीत गेला तेव्हा तो चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सच्या उदयाशी जुळला, ज्याने कंटेंट निर्मितीमध्ये क्रांती घडवून आणली. आता नवशिक्मयादेखील सोप्या प्रॉम्प्टसह प्रभावी एआय प्रतिमा, कंटेंट किंवा कल्पना तयार करू शकतात. असा चमत्कारिक शनि आहे. एक तर त्याला राशी बदल करायला अडीच वर्षे लागतात आणि दुसरे म्हणजे पूर्वासुरींनी आणि आत्ताच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या ज्योतिषांनी शनिची तयार केलेली इमेज. शनि महात्म्यसारख्या पोथीत शनिने कसा राजाचा रंक केला, भगवान शंकरालादेखील सोडले नाही इत्यादी इत्यादी आपल्या मनात इतके घर करून राहिले आहे की, शनिची दुसरी बाजू आपण साफ विसरतो. शनिचे काम भव्य आहे, दिव्य आहे. शनिमुळे आपल्या आयुष्यात जे बदल होतात ते कायमचे टिकतात. प्रचंड मोठे काम करणारे लोक हे शनिच्याच अमलाखाली येतात हे विसरून चालणार नाही. साडेसाती, अडेचकी (पनौती) या शब्दांना आपण इतके घाबरतो की एखाद्या नावडत्या माणसाला देखील ‘आला बघ तो पनौती’, ‘तो म्हणजे ना साडेसातीच आहे’ अशी वाक्मये सर्रास वापरतो. आपल्या पापांमुळे आपल्याला त्रास होतो हे कळले. काही दिवसापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात 66 करोड लोकांनी गंगास्नान केले. ते सगळे पाप मुक्त झाले का? मग तर त्यांना साडेसातीच काय पण इतर कुठल्याही ग्रहाची भीती बाळगायचे काही कारण नाही. असे होते का? नाही. कर्मकांडाने, पूजा-शांतीने जर हे होत असते तर जगात कोणीच दु:खी राहिले नसते. आपल्या कुंडलीप्रमाणे आपले कुठले कर्म कधी फलित होणार हे कळू शकते आणि त्या अनुसार सातत्याने आपल्यामध्ये जर बदल केले तर त्याचा उपयोग होतो हे सत्य. खरे सांगायचे तर ज्योतिषशास्त्रामध्ये गुऊ आणि शुक्राला नैसर्गिक शुभ ग्रह मानतात, सूर्याला क्रूर ग्रह मानतात, शनि, राहू, केतू, मंगळ यांना पापग्रह असे म्हणतात. म्हणजे हे ग्रह पापी आहेत का? अजिबात नाही. आपण केलेल्या पापाला इंडिकेट करणारे ग्रह म्हणजे शनि, राहू, केतू, मंगळ. याचाच अर्थ की, ते स्वत: त्रास देत नाहीत तर आपण केलेले पूर्वसंचितच आपल्याला त्रास देते. कर्म करत असताना आपण घाबरत नाही पण जेव्हा परत थोडीशी वेळ येते तेव्हा मात्र आपण घाबरतो आणि शांती, होम हवन यांच्या मागे लागतो. कर्म सुधारा, भाग्य सुधारेल हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवला पाहिजे. पुढच्या भागात मेष, धनु, सिंह, मीन यांच्यावर काय परिणाम होईल, जागतिक परिणाम काय होतील ते सांगतो. पण लक्षात ठेवा,

Advertisement

‘जैसी करनी आपनी, तैसा ही फल लेय । बुरे करम कमाईके, साईं दोष न देय ।।

- संत कबीर

Advertisement

मेष

तब्येतीच्या बाबतीत हेंडसाळ करू नका. आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ शकते. मन अस्थिर होण्याची शक्मयता आहे. कसली तरी हुरहूर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चिंती ते वैरी न चिंती असे होऊन जाईल. पण आशा चिंतेने तब्येतीची हेळसांड होईल, हेही लक्षात घ्या आणि तब्येतीला सांभाळा.

उपाय : नामस्मरण करा.

वृषभ

‘जैसी करनी वैसी भरनी’ हे लक्षात ठेवा. जोडीदाराचे सुख छान मिळेल. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल अथवा नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याचीपण शक्मयता आहे. त्यामुळे शक्मयतो वादविवाद टाळा. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : गरजूंना मदत करा.

मिथुन

उगाच कोणाची चेष्टा करायला जाऊ नका. अंगलट येईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी असेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लॉटरी किंवा गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. एखाद्या लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पाहायला हरकत नाही. आपल्या कामामध्ये बुद्धी चातुर्य दाखविण्याची संधी मिळाली तर सोडू नका.

उपाय : तुळशीला रोज पाणी घाला.

कर्क

कुणाचेही बोलणे जास्त मनावर घेऊ नका. हा आठवडा तुमचा अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी घालवा. एखादी छान ट्रिप काढा. पण आनंद साजरा करताना दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचाही आशीर्वाद घ्या, म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे.

उपाय : गाईला खाऊ घाला.

सिंह

मित्राची मदत मिळेल. अडकलेले काम होईल. धिम्या आवाजात बोला, कामे होतील. आपली तर पाचो उंगलिया घी में अशी अवस्था दिसत आहे. पैसा व नावलौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्मयता दिसत आहे. वरिष्ठ आपल्यावर खूश असतील. वडिलांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आपला आनंदात जाईल.

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

कन्या

तळ्यात मळ्यात आशा अवस्थेत राहू नका. वडील भावंडाचे सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा आपल्या व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. समाजात आपल्याला मानमरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्र मैत्रिणींच्या सहवासात आनंदात दिवस घालवाल. त्यांचे सुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल.

उपाय : लक्ष्मीची आराधना करा.

तूळ

आपलेच खरे ही भावना सोडा. शत्रू निष्प्रभ होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का? याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. नंतर पश्चात्तापाची वेळ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्या पिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळ करू नका.

उपाय : पक्ष्यांना पाणी द्या.

वृश्चिक

तुमचे वागणेच तुमच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ तामसी स्वभाव उफाळून वर येण्याची शक्मयता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. मातेच्या आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

उपाय : हनुमान चालीसा पारायण करा.

धनु

जास्त अहंकार नडू शकतो. आपले मत सगळ्यांकडे व्यक्त करू नका. कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात घालवाल. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेने आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्याने राहतील आणि ते तसेच रहावेत, यासाठी तुमचे प्रयत्न असतील.

उपाय : दत्ताची उपासना करा.

मकर

यश मिळेल. मान सन्मान मिळेल. ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल. पण थोडे कष्ट करावे लागतील असे वाटते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपली कर्तबगारी व बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल.

उपाय : मुंग्यांना साखर घाला.

कुंभ

अगोदरच्या चुकांपासून शिकाल. आर्थिक फायदा होईल. जवळच्या व्यक्तीशी मतभेद होतील. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. वाहन पार्किंग करताना योग्य ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक रहा.

उपाय : लक्ष्मीपूजन करा.

मीन

आळस सोडून कामाला लागा. नको असलेले काम करावे लागेल. संततीची काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता, अस्थिरता येण्याची शक्मयता आहे. सांभाळा. बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांची त्यांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.

उपाय : गरिबाला खायला द्या.

Advertisement
Tags :

.