राशिभविष्य
साडेसाती-अडीचकी 2025-सत्य आणि उपाय
दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनि महाराज स्वत:च्या कुंभ राशीमधून गुरुच्या मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. (मेषेची साडेसाती सुरू आणि मकरेची खतम!!!) तिथे आधीच सूर्य, राहू, बुध आणि शुक्र बसलेले आहेत. शनि आणि सूर्याचे बनत नाही त्यांच्यामध्ये वैरत्व आहे. बाप मुलाचे नाते बिघडलेले आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. दर अडीच वर्षानंतर होणाऱ्या या शनिच्या राशी परिवर्तनामुळे अनेक लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतील. मुळात साडेसाती म्हटले की, एकतर बऱ्याच जणांचे धाबे दणाणतात किंवा काहीजण ‘असले काही नसते’ असा अविर्भाव आणतात. काही लोक आतून घाबरलेले असतात पण वर दाखवत नाहीत! काही लोकांना इतरांचा अनुभव बघून टेंशन आलेले असते. या उलट काही लोकांना शांती, होम, हवन यातून गडगंज पैसा कसा मिळेल त्याचे वेध लागलेले असतात. पण एकूण साडेसाती काय आहे हे सोशल मीडियावरच्या पोडकास्ट आणि रील्स सोडून कोणालाही जाणून घेण्याची इच्छा नाही म्हणा किंवा सोर्स अव्हेलेबल नाही असे म्हणा, पण अज्ञान आहे हे नक्की. 1000 पत्रिकांचा अभ्यास केला असता जवळजवळ साडेसातशे ते आठशे पत्रिकांमध्ये साडेसातीच्या काळामध्ये विवाह होणे, चांगली नोकरी लागणे, प्रमोशन होणे, स्वत:चे घर होणे, संतती होणे अशा अनेक शुभ घटना घडलेल्या आढळतात.
जगभरच्या नेत्यांच्या कुंडलीमध्ये साडेसातीच्या काळामध्येच सत्ता हाती येणे हे कॉमन आहे. पण शनि म्हटले की दु:खाचा कारक, मृत्युतुल्य कष्ट देणारा, अपमान घडवणारा, व्यवसाय ठप्प करणारा, नोकरी सोडवणारा, नात्यांमध्ये दुरावा आणणारा, मानसिक अशांती देणारा असा ग्रह आहे, असे पारंपरिक ज्योतिषशास्त्र आणि आधुनिक ज्योतिषशास्त्र दोघांचेही म्हणणे असते. मग सत्य काय आणि असत्य काय? याबाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाद्वारे करणार आहोत. हा कागद जपून ठेवा. पुढील अडीच वर्षे हा उपयोगी येईल.
मेष
तब्येतीला सांभाळा. अवास्तव खर्च होण्याची शक्मयता आहे. वेळ चांगला राहील. ठरलेली कामे वेळेवर होतील. पैशाची आवक चांगली राहील व सहकार्यही प्राप्त होईल. मंगळवार व बुधवारी कामात अडथळे येतील. खर्च अधिक तसेच त्रास संभवतो. गुऊवारपासून वेळ आपल्या बाजूची असेल. शुक्रवार व शनिवारी दिलासादायक घटनेची शक्मयता आहे. डोके, कंबर दुखू शकते.
उपाय : अंध व्यक्तींना जेवण द्या.
वृषभ
आर्थिक व्यवहारात सावध रहा. एखादे कायदेशीर काम प्रलंबित असेल तर खूप धावपळ केल्यावर सोडवता येईल. वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला लाभदायक ठरेल. त्यावर कारवाई करा. घरात पाहुण्यांच्या आगमनाने आनंद राहील. छोट्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. उत्पन्नासोबत खर्चही वाढतील. बजेट व्यवस्थित ठेवा. बद्धकोष्ठता होण्याची शक्मयता.
उपाय : अन्नदान प्रमाणात करा.
मिथुन
गावचे एक तर तुमचे वेगळेच असे ऐकायला मिळेल. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवा. तऊण मजा करू शकतात आणि निष्काळजीपणे त्यांच्या हातातील यश गमावू शकतात. व्यवसायात बदल करण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा निर्णय फायदेशीर ठरेल. सरकारी सेवा करणारे लोक त्रस्त राहतील.
उपाय : मांसाहार करू नका.
कर्क
मन नसताना एखादे काम करावे लागल्याने त्रागा होईल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. प्रेमसंबंधातील छोटे-छोटे गैरसमज मतभेद निर्माण करतील. तणावपूर्ण परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवा. यामुळे तुमची मानसिक स्थिती आणि काम करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वत:वर घेण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा.
उपाय : तांब्याचे नाणे गळ्यात धारण करा.
सिंह
कोणत्याही परिस्थितीत मानसिक तोल ढळू देऊ नका. लोक अकारण बदनाम करू शकतात. जवळच्या नात्यात काही मुद्द्यावरून दुरावा निर्माण होऊ शकतो. वादात न पडलेलेच बरे. प्रवासाचे बेत आखले जातील, पण त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे पुढे ढकलले तर बरे होईल. तऊणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
उपाय : कोणाबद्दलचेही वाईट विचार मनात आणू नका.
कन्या
तुमचे आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध याबद्दल कुणाकडेही वाच्यता करू नका. व्यवसायात अधिक काम होईल. नफा सामान्य असेल, परंतु परिस्थितीत लवकरच बदल होण्याची शक्मयता आहे. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावे. तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. मित्रा-मित्रांमध्ये केलेली चेष्टा अंगलट येण्याची शक्मयता आहे.
उपाय : बदामाचे तेल डेरेदार झाडाखाली टाका.
तूळ
एखाद्याचे भले करायला जावे आणि त्याच माणसाने दगा द्यावा, अशी काहीशी परिस्थिती आहे. अपेक्षा करू नका. आर्थिक आवक सामान्य असेल. घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या कामात तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेतल्याने तुमचे नाते घट्ट होईल. थकवा आणि आळशीपणामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. आयुर्वेदिक गोष्टींचे जास्त सेवन करा. आराम मिळेल.
उपाय : सफाई कर्मचाऱ्यांना मदत करा.
वृश्चिक
होळीनंतर तब्येत बिघडते हा अनुभव नेहमीचा असला तरी या वेळी तितका धोका नाही. लाभदायक आणि शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे. या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. तुमची जुनी समस्या दूर झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल. गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. काही चोरी किंवा हरवण्याची शक्मयता आहे. मौजमजा करून विद्यार्थी नुकसान करतील.
उपाय : तांब्याचे कडे घाला.
धनु
पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्येही काहीसे वेगळे होण्याची शक्मयता आहे. व्यवसाय कार्य प्रणाली गुप्त ठेवा. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेऊ शकते. कर्मचाऱ्यांमध्ये राजकारण असू शकते. सर्व व्यावसायिक कामांवर लक्ष ठेवणे चांगले. सर्व कामे तुमच्या देखरेखीखाली करा. रक्तदाब आणि मधुमेहाच्या ऊग्णांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी.
उपाय : 7 मुखी ऊद्राक्ष धारण करा.
मकर
ठरवलेल्या ध्येयासाठी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे. तुम्हाला फोन कॉलद्वारे किंवा नातेवाईकाद्वारे महत्त्वाची माहिती मिळेल. कौटुंबिक परिश्र्रम आणि परिश्र्रम घेऊन कुटुंब योजनेची कामे पूर्ण होऊ शकतात. लॉटरी, जुगार, सट्टा यासारख्या कामांमध्ये नुकसान होण्याची शक्मयता आहे. अनावश्यक खर्च होईल. कोणाशी तरी वाद तुमचे नुकसान करू शकतो.
उपाय : केळीच्या झाडाला पाणी घाला.
कुंभ
व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता राखल्यास सुधारणा होईल. ऑफिसमधील नवीन कार्यपद्धतीमुळे तुमचे काम सोपे होईल. अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम कराल. त्यामुळे सर्व सदस्यांमध्ये आनंद, उत्साह आणि परस्पर सौहार्द राहील.
उपाय : मंदिरात दूध वाटा.
मीन
घाईत निर्णय घ्यावा लागू शकतो. काळजी करू नका, तुमचा निर्णय योग्य असेल. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. जवळच्या मित्राची भेट आनंददायी आणि आरामदायी असेल. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या तुम्हाला थकवू शकतात, परंतु कठोर परिश्र्रम आणि कार्यक्षमता राखा. निरूपयोगी कामात वेळ वाया घालवून करिअरशी खेळू नका.
उपाय : हळदीचा टिळा लावा.