राशिभविष्य खजाना
हरऽऽ हरऽऽऽ महादेव!!!!!!
‘शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे । शिवस्य हृदयं विष्णुं विष्णोश्च हृदयं शिव: ।। यथा शिवमयो विष्णुरेवं विष्णुमय: शिव: । यथान्तरं न पश्यामि तथा में स्वस्तिरायुषि । यथान्तरं न भेदा: स्यु: शिवराघवयोस्तथा ।।’ आपल्या समाजात जे वैष्णव आहे म्हणजे जे विष्णूला पूजतात आणि जे शैव आहेत म्हणजे जे शिवाला पूजतात, त्यांच्यात एक प्रकारचे वैरच पहायला मिळते. हे कोणी जाणूनबुजून केले आहे की, नैसर्गिक वैचारिक मतभेद आहे हे कळायला मार्ग नाही. गेल्या कित्येक दशकापासून म्हणा किंवा शतकांपासून म्हणा पण वैष्णव आणि शैव या दोन पंथांमध्ये वैर आहे हे कित्येक ठिकाणी नमूद केल्याचे आढळते. काही वैष्णव ‘शिव’ हा शब्दप्रयोग देखील करत नाहीत, इतकेच काय पण भिंत सारवताना आडवी न सारवता (कारण आडवी सारवली तर ती त्रिपुंडासारखी दिसते म्हणून!) उभी सारवतात. (हद्द आहे ना?) पण वर जो यजुर्वेदातील श्लोक दिला आहे तो या मतभेदावरचे सर्वात सुंदर उत्तर आहे. या श्लोकाचा अर्थ असा शिवाय विष्णुरूपाय - विष्णूचे रूप/सौंदर्य आणि त्याचा अवतार दुसरा कोणी नसून शिव आहे. दुसऱ्या शब्दात: शिव हा विष्णू आहे. शिवरूपाय विष्णवे-शिव रूपामध्ये असलेला विष्णू दुसरा कोणी नाही. दुसऱ्या शब्दात विष्णू शिव आहे. शिवस्य हृदयं विष्णुं विष्णोश्च हृदयं शिव:-विष्णू शिवाच्या हृदयात राहतात आणि शिव विष्णूच्या हृदयात राहतात. यथा शिवमयो विष्णुरेवं विष्णुमय: शिव:-विष्णू जिथे तुम्हाला शिव सापडेल त्याच ठिकाणी सापडेल आणि विष्णू त्याच ठिकाणी शिव सापडेल. जसे की तुम्हाला एक सापडला आहे, तुम्हाला दुसरा सापडला आहे. यथान्तरं न पश्यामि तथा में स्वस्थिरायुषि-आपण एकच आहोत. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला या दोघांमध्ये फरक आढळत नाही तोपर्यंत तो सुरक्षित आणि दीर्घायुषी असेल. अद्वैत अद्वैत म्हणतात ते इथूनच सुरू होते असे तुम्हाला वाटत नाही का? हा परमशिव आहे तरी कसा? दिसतो कसा? शंभू (‘सौम्य’), शंकर (‘अति पवित्र, अति मंगल करणारा’), महेश (‘महा-ईश’) आणि महादेव (‘महान देव’) हे त्यांच्या सामान्य उपनामांपैकी आहेत. 11 व्या शतकाच्या सुऊवातीस, तामिळनाडूतील तिऊवेनगाडू येथील दक्षिण भारतीय कांस्य मूर्तीत, सौम्य वेषातील शिव सापडतो. तंजावर म्युझियम आणि आर्ट गॅलरी, तामिळनाडूमध्ये शिवाचे विविध रूपांमध्ये चित्रण सापडते. त्याची पत्नी पार्वती आणि पुत्र स्कंद यांच्यासोबत शांत मूडमध्ये, वैश्विक नर्तक (नटराज), एक नग्न तपस्वी म्हणून, एक भक्त भिकारी म्हणून, योगी म्हणून, एक तामसी तांत्रिक म्हणून ज्याच्या सोबत एक कुत्रा (भैरव) आहे आणि शिव आणि पार्वतीचे एका शरीरात मिलन म्हणून, अर्धा पुऊष आणि अर्धी स्त्राr (अर्धनारीश्वर). तो महान तपस्वी आणि प्रजननक्षमतेचा स्वामी आहे आणि सापांवर त्याच्या द्विधा शक्तीमुळे तो विष आणि औषध या दोन्हींचा स्वामी आहे. गुरांचा स्वामी (पशुपती) म्हणून (शेतीचा पुरस्कर्ता-गुरांचा स्वामी-गोपाल (?)), तो परोपकारी पशुपालक आहे. सोशल मीडियाचे सध्याला थैमान चालू आहे. अशाच एका रीलमध्ये एका प्रसिद्ध संशोधनात्मक टीव्ही चॅनलवर बघितलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या ज्या देवदेवता आहेत त्या परग्रहावरून आलेल्या एनटीटीज आहेत, असे दाखवण्यात आले. या देवतांमध्ये भगवान शिव शंकराचाही समावेश होता. म्हणजे त्यांना असे म्हणायचे होते की, भगवान शिव हे परग्रहावरून कुठून तरी आलेले पृथ्वीवरचे देव किंवा महादेव आहेत. वायफळ बोलायला कुणाचे काही जात नाही आणि काही पैसे लागत नाहीत. त्यांना हे सिद्ध करण्याकरता त्यांच्याकडे असलेल्या काही बेमतलब तर्काशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आपल्याकडे शिव महापुराण, अग्निपुराण, स्कंधपुराण अशा अनेक गोष्टीरूपी इतिहासातून आदीभौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाच्या पलीकडे असलेले देवतांचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या संतांनी जे सांगितले तेच आम्ही मानणार, बरोबर ना? ‘आम्ही संतांची लेकरे आम्हा नसे दुजे ठाव, संत वचनी जीव आमुचा, संत वचनी आमुचा भाव!’ आणि त्यात भरीस भर म्हणून सध्याचे काही गुऊ शिवशंकरांच्या अस्तित्वाबद्दल (?) निर्माण करतात. कोणी म्हणते की शिवा हा आदीयोगी असून हजारो वर्षांपूर्वी होऊन गेला. (याच गुरुमुळे शिवाची अर्धी मूर्ती आजकाल घरात, कारमध्ये पहायला मिळते जे अत्यंत चुकीचे आहे. शिव मूर्ती ही केवळ स्मशानातच असावी.) कोणी म्हणते ती शिव हे परमात्मा तत्त्व आहे. पण कोणी काहीही म्हणो, आमच्या करता आम्हाला प्रपंचाच्या भयापासून मुक्त करणारा, संजीवनी देणारा आधी व्याधीपासून वाचवणारा जो योगीही आहे आणि भोगीही आहे. हाती त्रिशूल घेऊन स्मशानात वास करणारा आभूषणाच्या नावाखाली ऊद्राक्ष धरण करणारा, अति घोर आणि अ-घोर देवाधिदेव महादेव असाच आहे. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, आजकाल बऱ्याच चित्रांमध्ये शंकराला चिलीम ओढताना, गांजा पिताना, भांग पिताना असे दाखवले जाते. भरकटलेल्या तऊणाईला या गोष्टींच्या आकर्षणापायी शंकराचे आकर्षण वाटणे साहजिक आहे. पण जरा विचार केल्यानंतर लक्षात येईल की, ज्या ज्या गोष्टींना विष समजले जाते त्या त्या गोष्टींना शंकराने आपलेसे केले आहे. ज्याने साक्षात हलाहल आपल्या कंठात धारण केले आहे त्याला बाकीच्या विषयांचे काय भय? ज्याने विषारी सर्पाला गळ्यामध्ये धारण केले आहे त्याच्या ठिकाणी कुठली भीती? शंकराच्या भक्तीच्या नावाखाली भांग पिणे, गांजा ओढणे यासारख्या गोष्टी करणाऱ्यांना शंकराची तपश्चर्या दिसत नाही. त्याच्या ठिकाणी असलेले वैराग्य दिसत नाही. तंत्र, योग यासारख्या गोष्टींचा उगम ज्याच्या ठिकाणी झाला त्या परम शिवाची शक्ती दिसत नाही, दिसते काय तर फक्त शंकराने जवळ केलेल्या वस्तूंमध्ये असलेली नशा. महादेव भोले भंडारी आहेत यात शंकाच नाही पण क्रोधाग्नीमध्ये त्यांच्या जवळही जाण्याची हिंमत कोणात नाही हे लक्षात असू द्या.
मेष
शारीरिक कष्ट वाढण्याची शक्मयता आहे. एक अनामिक भीती कायम सतावत राहील. विनाकारण फार चिंता करत बसू नका. उधार न दिलेले बरे. कुटुंबात सहकार्याची भावना ठेवा. एकांगी दृष्टिकोनामुळे व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्मयता. अनुकूल वातावरण राहील. सन्मान मिळेल. पोटाचा आजार होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे.
उपाय : अंध व्यक्तींना जेवण द्या.
वृषभ
आपणास काही आव्हानात्मक गोष्टी अथवा कार्य करावे लागणार आहे. आपल्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे खर्चावर अधिक निर्बंध ठेवावे लागणार आहेत. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला उत्तेजन मिळेल. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. सध्या उसनवारी घेण्याचे टाळा. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका. दैनंदिन कार्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
उपाय : मांसाहार करू नका.
मिथुन
एकंदर आपले ग्रहमान पाहता आपल्याबद्दल गैरसमज पसरणार नाहीत, याची दक्षता घेतल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करणे शक्मय होईल. कोणत्याही कामात दक्ष राहून उणिवा राहणार नाहीत, याची काळजी घ्या. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीमान ठीक राहील. घरासंबंधीचे प्रश्न सुटू लागतील. स्वत:चा उत्साह टिकवून ठेवाल.
उपाय : तांब्याचे नाणे जवळ ठेवा.
कर्क
प्रयत्नाने यश मिळेल. आपले ग्रहमान पाहता आपण प्रयत्नशील राहून आपले उद्दिष्ट गाठण्यास तयार राहा. कोणताही ताण न घेता आपले नियोजित कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याल. सरकारी कामांना प्राधान्य द्या. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
उपाय : खोटे बोलू नका.
सिंह
या सप्ताहात कामकाजात काही अडथळे येण्याची शक्मयता राहील. घरगुती कामाचे तणाव जाणवू लागतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कामासाठी धावपळ करावी लागणार आहे. राजकीय क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. कोर्ट-कचेरीची कामे वेग घेतील. स्वत:वर नाराज होण्याची मानसिकता बदलणे ठीक राहील.
उपाय : चांदीचा तुकडा जवळ ठेवा.
कन्या
मानसिकता त्रस्त असल्यासारखे, काहीसे गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये वावरण्याची शक्यता राहील. आर्थिक बाजू सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. आपल्या अथक परिश्र्रमाने आपण आपली यशाची वाट सुधारू शकाल. प्रकृतीबाबत आपण अधिक जागरूक राहावे. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नातेमंडळीत गोडवा राहील. कोणत्याही बंधनात अडकू नका.
उपाय : चिमण्यांना दाणे टाका.
तूळ
तब्येतीला सांभाळावे लागेल. आपले ग्रहमान पाहता कला, क्रीडा, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात आगेकूच करण्याची संधी मिळण्याची शक्मयता राहील. कौटुंबिक वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत, याची दक्षता घ्या. जोडीदाराशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. नोकरदारांना दिलासा मिळू शकेल.
उपाय : घरात गंगाजल ठेवा.
वृश्चिक
सध्याचे ग्रहमान पाहता आपणास अपेक्षित अशा गोष्टी साध्य होण्याची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. विरोधक गप्प बसतील. सहकारी व आप्तेष्टांच्या गाठीभेटीची शक्मयता राहील. प्रवासात सावधानता बाळगा. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुकृपेचा लाभ मिळू शकेल. आपला दृष्टिकोन बदला, लाभ मिळेल.
उपाय : मिठाचे प्रमाण कमी करा.
धनू
प्रतिकूल परिस्थितीतून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा काळात मनाप्रमाणे कामे होणे कठीण असते. कोणालाही दुखवू नका. आर्थिक बाजू ठीक राहील. महत्त्वाच्या कामी मोठ्यांचा सल्ला घ्यावा. क्रीडा व राजकीय क्षेत्रात बस्तान बसविता येईल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. लिखाणात सावधानता बाळगा. प्रकृतीची पथ्ये पाळा.
उपाय : काळ्या गाईला खाऊ घाला.
मकर
आर्थिक बाजू सावरता येईल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. व्यापार, उद्योगाला चालना मिळेल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कौटुंबिक वातावरण वादविवादासारख्या प्रसंगाने बिघडणार नाही, याची दक्षता घ्या. आवश्यक तेथे ज्येष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन उपयोगी पडेल. कायदा व नियम पाळा. जोडीदाराशी सामंजस्याने वागा.
उपाय : गो मातेची सेवा करा.
कुंभ
कामाचा तणाव कमी होईल व आपले दैनंदिन काम पार पाडता येईल. कोर्ट-कचेरीच्या कामात यशाची अपेक्षा ठेवू शकता. अचानक प्रवासाचे योग संभवतात. नको त्या प्रलोभनात अडकू नका. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणालाही नाराज करू नका. आप्तेष्टांशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी बाळगता येईल.
उपाय : मंदिरात गहू दान द्या.
मीन
कार्यक्षेत्रात बऱ्याच जबाबदाऱ्या वाढतील व बराच काळ प्रतीक्षा करीत असलेल्या गोष्टी मिळू शकतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक राहील. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबासमवेत प्रवासाला जाण्याचे बेत आखाल. घरात नवीन वस्तू खरेदीचे बेत आखाल. प्रकृतीबाबत अधिक जागरूक राहा.
उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.