For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:10 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

नववर्षाची भेट - 4

Advertisement

विवाहासंबंधी अडचणी दूर होण्याचे उपाय

शिव-पार्वती पूजा हा अमोघ उपाय आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. गाईचे कच्चे दूध शिवलिंगाला अर्पण करावे. हनुमानजींची पूजा करा. मंगळवारी हनुमानजींना गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे लाडू अर्पण करा. गुऊवारी वटवृक्ष, पिंपळाचे झाड आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करा. गुऊवारी केळीच्या झाडाखाली गायीच्या देशी तुपाचा दिवा लावावा. गुऊवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. जेवणात केशराचे सेवन करा. श्री गणेशाची पूजा करावी. मुलींनी गणपती महाराजांना मालपुवा (मलिदा) अर्पण करावा. पिठाच्या गादीवर थोडी हळद लावून थोडा गूळ व हरभरा डाळ गायीला खायला द्या. दररोज शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा केल्याने विवाहाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

Advertisement

आजकाल विवाहाचे वय 30 च्या दरम्यान पोहोचले आहे. पण त्यामुळे पालकांना खूप चिंता होते. खरे तर विवाह लवकर होण्यापेक्षा विवाह चांगला आणि सुखमय व्हावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वयाच्या कोणत्या वेळी विवाहासाठी कोणते उपाय करावेत ते सांगतो. अनेक वेळा लोक जाणूनबुजून उशिरा लग्न करतात, परंतु काहीवेळा आपल्याच नातेवाईकांमुळे लग्नालाही उशीर होतो. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येत असतील आणि तुमचे वय 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असेल तर हे ज्योतिषीय उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. गुऊवारी संध्याकाळी पिवळे वस्त्र परिधान करून शिव आणि पार्वतीला एकच पुष्पहार अर्पण करावा. शिव आणि पार्वतीची संयुक्त पूजा करून ‘ॐ गौरीशंकराय नम:’ चा जप करा, हा उपाय तीन महिने करावा लागतो. जर तुमचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही लग्न का होत नाही ही चिंता करत असाल तर गुऊवारी पिवळे कपडे घालून पूजा करा. शिवलिंगावर चंदनाचा सुगंध अर्पण करा. नंतर पाण्याच्या धारा अर्पण करा. ‘ॐ पार्वतीपतये नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे उपाय किमान नऊ गुऊवारी करा. जर तुमचे वय 31 ते 35 वर्षांच्या दरम्यान असेल तर काहीवेळा कुंडलीतील ग्रह वैवाहिक जीवनात असे अडथळे निर्माण करतात की, एखादी व्यक्ती इच्छा असूनही नाते जोडू शकत नाही. जर तुम्ही वयाची 31 वर्षे ओलांडली असेल, पण तुम्हाला हवे ते नाते जमत नसेल, तर घराच्या अंगणात केळीचे रोप लावा. गुऊवारी केळीच्या झाडाखाली किंवा केळीच्या पानावर बसा. यानंतर “ॐ ब्रीं बृहस्पतये नम:” च्या तीन माळा जप करा. गुऊवारी मिठाचे सेवन करू नये. हा प्रयोग 11 गुऊवारी करा. वयाची 35 ओलांडली असेल तर पुढील उपाय करा, ज्योतिषांच्या मते प्रत्येक वयावर ग्रहांचा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे वयानुसार लवकर लग्न करण्याचे उपाय करावेत. चला तर मग जाणून घेऊया 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लवकर लग्नासाठी कोणते निश्चित उपाय आहेत. 108 बेलाची पाने घ्या आणि प्रत्येक बेलाच्या पानावर चंदनाने ‘राम’ लिहा. यानंतर सर्व बेलाची पाने एक एक करून शिवलिंगावर अर्पण करा, प्रत्येक बेल पान अर्पण करताना ‘ॐ नम: शिवाय’ म्हणा. गुऊवारी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करा. हा उपाय 3 गुऊवारी करा. लग्न लवकरच होईल.

लग्नासाठी 10 ज्योतिषीय उपाय : 1) शुक्रवारी अविवाहित मुलींना खीर आणि मिठाई अर्पण करा आणि विवाहित महिलांना लग्नाचे साहित्य वाटप करा. असे 16 शुक्रवार नियमित केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. 2) तुम्ही सोमवारी शिव आणि पार्वतीच्या मूर्तीला आपल्या उंचीच्या बरोबरीने लाल-पिवळा दोरा गुंडाळा, त्यानंतर भगवान शिव आणि पार्वतीला दुधाचा अभिषेक करा. तऊण  मुलगा/मुलगी ज्या पलंगावर झोपते त्याखाली कोणतीही लोखंडी वस्तू किंवा कोणत्याही प्रकारची खराब वस्तू किंवा रद्दी ठेवू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.

(क्रमश:)

मेष

आत्मविश्वासामध्ये थोडी कमी होऊ शकते. तब्येतीलादेखील सांभाळावे लागेल. धनप्राप्ती उत्तम असल्याने आणि कौटुंबिक वातावरण चांगले असल्याने समाधान वाटेल. प्रवासामध्ये नवीन ओळखी होतील आणि त्यामधून लाभ होऊ शकतो. कागदपत्रे व्यवहारात यश मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदी-विक्रीमध्ये फायदा होण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंध मधुर होतील. नोकरदार वर्गाने सावध रहावे.

उपाय : हळदीचा टिळा लावावा.

वृषभ 

आरोग्याच्या बाबतीत भाग्यवान असलेली रास तुमची आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही बेसावध रहावे. परिवारातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. बोलण्याचे कौतुक होईल. तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे दुसऱ्याचा फायदा होईल. कागदोपत्री व्यवहारात तुम्ही चोख असल्याने नुकसान टळेल. जमीन जुमल्याच्या बाबतीत भाग्यवान असाल. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे ताणतणाव येऊ शकतो. शेअर बाजारापासून दूर रहा.

उपाय : केळीचे मूळ जवळ ठेवावे.

मिथुन

बाहेरील खाणे-पिणे टाळावे. प्रवासाचे योग आहेत. घरच्यांची उत्तम साथ मिळेल. जमिनीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेम प्रसंगात यश मिळेल. छोट्या लाभाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवावे.

उपाय : शुक्रवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

कर्क

दोषयुक्त हवेमुळे तब्येतीच्या तक्रारी होऊ शकतात. घरातील वातावरण चांगले असेल. पैशांची आवक उत्तम राहील. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. भावंडांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ स्त्राrशी मतभेद होऊ शकतात. शेअर्समधून लाभ होईल. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. दूरच्या प्रवासाचे योग असले तरी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

उपाय : आंघोळीच्या पाण्यात हळद घाला.

सिंह

तब्येतीची साथ राहील. वस्तू गहाळ होण्याची शक्मयता आहे. घरामध्ये वाद होऊ देऊ नका. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास घडेल. जमिनीच्या वादामध्ये यश मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. छोट्या गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्मयता आहे. प्रेम प्रसंगात यश मिळेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. आपले काम चोख करावे.

उपाय : बांधकाम मजुरांना ताक घ्यावे.

कन्या 

पैशांच्या बाबतीमध्ये काहीसे असमाधानकारक वातावरण असण्याची शक्मयता आहे. केलेल्या कष्टाचा मोबदला मनासारखा न मिळणे किंवा काही ठिकाणी पैसे अडकणे असे होऊ शकते. प्रॉपर्टीसंबंधी विवाद जोर धरू शकतात. प्रतिकारकता  कमी झाल्याने संसर्गजन्य रोगाची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळेल.

उपाय : सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घाला.

तूळ

तब्येतीला सांभाळावे लागेल. पथ्यपाणी अजिबात चुकवू नका. बोलण्यामध्ये एक कमालीचे आकर्षण निर्माण होऊ शकते. नोकरदार वर्गाला याचा फायदा चांगला होईल. व्यावसायिकांना यातून चांगला नफा मिळण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. तीर्थयात्रेला जावे किंवा आध्यात्म्य प्रवास करावा, असे वाटू शकते. मानसन्मानाचे योग आहेत.

उपाय : गंगाजल जवळ ठेवा.

वृश्चिक

करायला जावे एक आणि व्हावे भलतेच, असा काहीसा विचित्र योगायोग या काळात घडण्याची शक्मयता आहे. आर्थिक प्राप्तीकडे जास्त कल असेल. कुटुंबातील व्यक्तींकडे जास्त लक्ष द्याल. जवळच्या एखाद्या व्यक्तीकरता आर्थिक किंवा इतर प्रकारची मदत करावी लागू शकते. सोबत काम करणाऱ्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा.

उपाय : पक्ष्यांना दाणे घालावे.

धनू

तुमच्या मागे लोक काय बोलतात याचा चुकूनही विचार करू नका. तुम्हालाच त्रास होईल. मन संवेदनशील होण्याची शक्मयता आहे. पण याचा फायदा दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. छोटा-मोठा प्रवास घडू शकतो. पाण्याच्या ठिकाणी जाणार असाल तर सावध रहा. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला आहे. छोट्या-मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे.

उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करावी.

मकर

कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्राrच्या मदतीने कामे पूर्ण होण्याची शक्मयता आहे. या काळात चुकूनही शेअर बाजारासारख्या बेभरवशाच्या गुंतवणुकीमध्ये पैसा घालू नका. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊन कटूता निर्माण होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात विचित्र घटना घडेल.

उपाय : तांदूळ दान द्यावे.

कुंभ

स्वभावामध्ये रोमँटिकपणा येईल. लक्झरी आयटम्सकडे ओढ वाढेल. जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणावे असे जाणवेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर सुसंवाद घडेल. आनंद प्राप्ती होईल. जुनी एखादी चिंता सतावू शकते. कोणतेही कारण नसताना भीती वाटू शकते. एखाद्या तीर्थयात्रेला किंवा धार्मिक स्थळी कुटुंबीयांसोबत भेट द्याल.

उपाय : देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

मीन

अनामिक भीती किंवा टेन्शन वाढू शकते. मानसिक ताकद वाढवण्याची गरज आहे. अचानक धनलाभाचे योग होत आहेत. आध्यात्मिकविषयी ऊची वाढेल. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हाल. कामाच्या ठिकाणी कामांचा उरक वाढवण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभामध्ये तुमचे कौतुक होईल.

उपाय : गाईला हिरवा चारा घाला.

Advertisement

.