For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

खजाना राशिभविष्य

06:05 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

4.11.2026 ते 10.11.2026

Advertisement

मेष

आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल तर त्यात वृद्धी संभवते. जोडीदाराचे सहकार्यही मिळेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीच्या बातम्या ऐकून सुखावून जाल. पण वडील भावंडाशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. मतभेदाचे रुपांतर भांडणात होऊ देऊ नका. ते तुम्हालाच नव्हे तर तुमच्या कुटुंबालासुद्धा सुखावह राहणार नाही. बोलण्यात संयम ठेवा.

Advertisement

उपाय : शनिवारी दशरथकृत शनैश्चर स्तोत्र वाचा.

वृषभ

तुमचे काम चोखपणे आणि व्यवस्थित नीटनेटके होईल. त्यामुळे आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र गुप्त शत्रुपासून थोडे सावध रहा. परदेशी जाण्याची संधी मिळेल. वाहन किंवा जागा खरेदी करण्याचा विचार येऊ लागेल. पण कागदपत्रांची पूर्ण शहानिशा झाल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. सांभाळा.

उपाय: तुळशीला पाणी घाला.

मिथुन

छोट्या भावंडासोबत छान दिवाळी साजरी कराल. दिवाळी आनंदात जाईल. शेजाऱ्यांशी चांगले खेळीमेळीचे संबंध होतील. ते तसेच टिकविण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या बाबतीतही चांगली बातमी ऐकायला मिळेल. या सगळ्या धामधुमीत  आपल्या अंगी असलेली कोणती तरी सुप्त कला लोकांसमोर येईल व तुमचे कौतुक होईल.

उपाय : तिन्हीसांजेला लक्ष्मीला लाल गुलाब वाहून लक्ष्मीची पूजा करा.

कर्क

आत्मविश्वास वाढेल पण त्याचबरोबर कदाचित हेकेखोरपणाही वाढेल. सांभाळा. स्वत:वर नियंत्रण असू दे. बाकी तुमचे काम चोख असेल. काही स्पर्धात्मक कार्यात यश मिळेल. आपली शिस्तबद्धता यावेळी कामास येईल. आईचा आशीर्वाद व सहवास मिळेल. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आनंदी रहा.

उपाय : सोमवारी महादेवाला बेल वाहा.

सिंह

या आठवड्यात लक्ष्मी प्रसन्न असण्याची शक्यता आहे. आपली प्राप्ती वाढेल. आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल तर त्यात वृद्धी संभवते. पण त्यासाठी कष्ट मात्र घ्यावे लागतील. कामाच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे आणि तो चांगलाच असेल. आपल्या वडीलभावंडाच्या गाठीभेटी होतील. सभासमारंभात सहभागी व्हाल.

उपाय : मंगळवारी संकटनाशक गणपतीस्तोत्र म्हणा.

कन्या

प्रत्येक कामातून मन उडेल. काही करू नये असेच काहीसे वाटेल. पण मनावरचे हे मळभ दूर सारून कामाला लागणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सांभाळून रहा. गुप्तशत्रू तुमच्याकडून होणाऱ्या चुकीची वाट पहातच असतील. कामात चूक होऊ देऊ नका. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कुटुंबाकडून आपल्याला चांगलेच सहकार्य मिळेल.

उपाय : मुक्या प्राण्यांना चारा पाणी करा.

तुळ

आपला थोडासा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. गोंधळून जाऊ नका. आपले ध्येय निश्चित करा. नोकरीत सहकार्य चांगले मिळेल. वडीलभावंडांच्या  गाठीभेटी होतील. त्यांचा सहवास मिळेल. मित्र व नातेवाईकांच्या सहवासात यंदाची दिवाळी छान जाईल. सभा संमेलने यात सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्याचा तुम्हाला फायदाच होईल.

उपाय : सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करा.

वृश्चिक

आपले बोलणे सुधारलेले आपल्यालाच जाणवेल. विचारपूर्वक व संयमी बोलाल. समोरचा माणूसदेखील काही काळ आपले बोलणे ऐकून थक्क होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आपले वजन वाढेल. सगळेजण आपल्या सल्ल्यानुसार कामे करतील. त्यामुळे जबाबदारीने वागा. एखादे भाषण किंवा विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देण्यासाठी बोलावणे येण्याचा संभव आहे.

उपाय : गुरुवारी दत्तमंदिरात जाऊन दर्शन घ्या.

धनु

भावंडांच्या गाठीभेटी होतील. दिवाळी छान साजरी होईल. मित्र व नातेवाईकांच्या सहवासात हा आठवडा आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी मात्र कामात कसूर होऊ देऊ नका. शेजाऱ्यांशी संबंध सलोख्याचे राहतील. आपल्या हातून काही छान लेखनकार्य घडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे समाजात ओळख निर्माण होईल.

उपाय : घराच्या वायव्येला रोज धूप लावा.

मकर

एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडचिड होण्याची शक्यता आहे. पण समाधानाने घ्या. कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळेच घडेल असे प्रत्येक वेळेला होईलच असे सांगता येत नाही. कित्येकवेळा समजून घ्यावे लागते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण तो योग्य मार्गाने यावा. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे.

उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.

कुंभ

काही दैनंदिन व्यवसाय असेल तर त्यात प्रगती होईल. पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही. जोडीदाराची साथ मिळेल. दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. कदाचित त्यातून काही शिकायला मिळेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ती शैक्षणिक सहलही असू शकेल. दिवाळीच्या फराळावर ताव मारताना तब्येतीला सांभाळा.

उपाय : शनिवारी शनिस्तोत्र वाचा.

मीन

नोकरीत आपल्या सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. गुप्तशत्रूंच्या कारवायाकडे थोडे लक्ष असू द्या. खाण्यापिण्यावर  संयम असू द्या. अडकलेला पैसा अचानकपणे मिळण्याचा संभव आहे. सरकारी कामातून अथवा कोणत्या तरी सरकारी योजनेतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कदाचित परदेशातील व्यवसायाकडून धनलाभ संभवतो.

उपाय : शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

Advertisement

.