For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:05 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

बुधवार, दि. 25 फेब्रुवारी ते मंगळवार, दि. 3 मार्च 2026 पर्यंत

Advertisement

मेष

या आठवड्यात आपल्याला आईचा सहवास लाभेल. तिचे प्रेम पुरेपूर मिळण्याची शक्यता आहे. मात्र थोडे तिच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपण घर किंवा जागा घ्यायच्या विचारात असाल, तर पूर्ण विचारांनी घ्या. निदान त्या बाबतची बोलणी या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता दिसते.

Advertisement

उपाय : मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.

वृषभ

संततीच्या प्रगतीचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची मुले अजून लहान आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कदाचित आपल्या मार्गदर्शनाची त्यांना आवशक्यता आहे आणि त्यातूनच त्यांना व तुम्हालाही फायदा होईल. आपण शिकत असलेल्या किंवा शिकलेल्या विद्येचा आपल्याला फायदाच होण्याचा संभव आहे.

उपाय : शुक्रवारी सायंकाळी कमळात बसलेल्या महालक्ष्मीची पूजा करा.

मिथुन

या आठवड्यात आपल्याला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. हाताखालील नोकरांचे आपल्याला सहकार्य मिळेल. परदेशातूनही प्राप्ती होण्याची शक्यता आहे. पण तब्येतीला जरा सांभाळा. औषध-पाण्यावर खर्च संभवतो. आपल्या जवळच्या मौल्यवान वस्तू सांभाळा. बाकी हा आठवडा ठीक जाईल.

उपाय : पक्ष्यांना चारा-पाणी द्या.

कर्क

जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव अडकून राहिलेले विवाहसुद्धा संपन्न होण्याचा संभव आहे. आपला काही दैनंदिन व्यवसाय असेल, तर त्यातही वृद्धी होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याचा संभव आहे.

उपाय : गायीला गूळ-भाकरी/चपाती खायला द्या.

सिंह

अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण ते धन स्वीकारताना ते योग्य मार्गाने आले आहे की नाही, याची खात्री करून घेऊनच ते स्वीकारा. अन्यथा फसले जाण्याची शक्यतापण नाकारता येत नाही. शिवाय असा पैसा फळणार नाही. या आठवड्यात आपल्याला कोणती तरी मानसिक व्यथा सतावेल.

उपाय : मंगळवारी बजरंग बाणचा पाठ करा.

कन्या

छोटी-मोठी तीर्थयात्रा घडण्याचा संभव आहे. त्या निमित्ताने सत्संग घडेल. आपल्या वडिलांचे किंवा वडिलधाऱ्या मंडळींचे सहकार्य, आशीर्वाद लाभतील. आपले काही विम्याचे कागदपत्र अडकले असतील, तर या आठवड्यात मार्गी लागण्याचा संभव आहे. या आठवड्यात आपल्या हातून काही परोपकार संभवतो.

उपाय : सोमवारी शंकराला बेल वाहा.

तुळ

नोकरीत असाल, तर आपले काम अतिशय चांगले होऊन आपले वरिष्ठ आपल्यावर खूश होण्याची शक्यता आहे. पदोन्नती, मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र उद्योग व्यवसाय करत असाल, तर व्यवसायात प्रगती होण्याचा संभव आहे. समाजात एक प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा आठवडा आनंदात घालवाल.

उपाय : मुंग्यांना साखर घाला.

वृश्चिक

सभा-समारंभात सहभागी होऊन तेथून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण आपली स्वप्ने पूर्ण करताना खूप धडपड कराल आणि त्याचे चीजही होण्याची शक्यता आहे. समाजात आपल्याला मानसन्मान मिळेल. आपला सामाजिक दर्जा उंचावेल. उंची भेटवस्तू मिळतील. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय : मंगळवारी हनुमानाच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.

धनु

खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. अर्थात जर चांगल्या कामासाठी खर्च होत असेल तर करा. पण गरज नसताना खर्च करू नका. परदेशी मालाच्या देवघेवीवर फायदा मिळण्याची शक्यता आहे आणि कदाचित या कामासाठी आपली परदेशवारीदेखील होण्याची शक्यता आहे. आपल्या आईला तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे.

उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळावर चंदनटिळा लावा.

मकर

या आठवड्यात आपले मन काहीसे अस्वस्थ व चलबिचल राहण्याची शक्यता आहे. काहीसे उदास राहील. कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होण्याचा संभव आहे. हे करू का ते करू असे वाटेल. पण मनाला शांत करा. एकाग्र करा. मग निर्णय घ्या. आईचा सन्मान होईल.

उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.

पुंभ

कुटुंबात कोणत्या तरी कारणावरून गोंधळ उडण्याचा संभव आहे. वाणीवर संयम ठेवा. शक्यतो वाद टाळण्याचा प्रयत्न करा. वडिलोपार्जित संपत्तीवरून काही चर्चा चालू असेल, तर सामंजस्याने चर्चा पूर्ण होऊ शकते. हातून काही लेखन कार्य होण्याचा संभव आहे. त्यामुळे आपली बुद्धी योग्य ठिकाणी लावा.

उपाय : शनिवारी शनि चालिसा वाचा.

मीन

आपले प्रेझेंटेशन, आपले काम या आठवड्यात छान होईल. त्याचा फायदा पण आपल्याला मिळेल. शेजाऱ्यांशी संबंध जर बिघडले असतील, तर आता ते सुधारण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही होईल. तिथे काही साहस वगैरे काही करायला जाऊ नका. सांभाळून रहा.

उपाय : भिकाऱ्यांना तळलेले पदार्थ खाऊ घाला

Advertisement
Tags :

.