राशीभविष्य खजाना
बुधवार दि. 18 ते मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत
मेष
घर, वाहन वगैरे खरेदीच्या विचारात असाल, तर सांभाळून करा. नीट सगळी कागदपत्रे पडताळून पाहूनच पुढे पाऊल टाका. कदाचित दाखवतील एक व देतील दुसरेच असेही होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. सतर्क राहिलात, तर हा आठवडा छान जाईल. कारण नसताना कुणामध्ये मध्यस्थी करू नका.
उपाय : मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा.
वृषभ
हा आठवडा आपल्याला छान जाईल, असे वाटते. पण आळशीपणा सोडा आणि कामाला लागा. आपल्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. त्यांच्या अभ्यासात तुमची त्यांना गरज भासण्याची शक्यता आहे. अर्थात मुलांची चिंता करू नका. पण लक्ष द्या. त्यांची प्रगती होईल. अभ्यासाचेच दिवस आहेत. तुमचा पाठिंबा त्यांना महत्त्वाचा आहे.
उपाय : गायीला गूळ-चपाती खाऊ घाला.
मिथुन
घरातील मौल्यवान वस्तुंना सांभाळा. हरवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची चिंता वाटण्याचा संभव आहे. पण चिंता करू नका. चिंता शरीराला जाळते. नोकरी-धंद्यात काही अडचण आल्यास विचार विनिमयाने ती सोडवता येते. आईचा कुठेतरी छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
उपाय : घराबाहेर पडताना केशरी टिळा लावा.
कर्क
एवढ्या तेवढ्या गेष्टीवर चिडचिड होण्याचा संभव आहे. शांततेने घ्या. दैनंदिन काही व्यवसाय असेल, तर त्यात प्रगती संभवते. जोडीदार अथवा व्यावसायिक पार्टनरचा सल्ला अवश्य घ्या. त्याचा फायदा होईल. या आठवड्यात चोरीला गेलेल्या किंवा चुकून इकडे तिकडे ठेवल्या गेलेल्या वस्तू मिळण्याचा संभव आहे.
उपाय : ॐ नम: शिवायचा जप करा.
सिंह
आपल्याला या आठवड्यात धनलाभ संभवतो किंवा धनलाभाची लालूच दाखविण्यात येईल. पण प्रलोभनापासून दूरच रहा. जो पैसा मिळतो आहे तो योग्य मार्गाने मिळतो की, नाही याची खात्री करून घ्या आणि योग्य मार्गाने असेल, तर तो स्वीकारा. पण त्याची मस्ती करू नका. तो जसा येतो तसा जातोसुद्धा.
उपाय : काळ्या मुंग्यांना साखर घाला.
कन्या
हा आठवडा तुम्हाला काहीसा अध्यात्म, पूजा अर्चा यामध्ये ओढण्याचा संभव आहे. घरी काही धर्मकार्य घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. एखादा प्रवासही घडण्याची शक्यता आहे. वडील व वडिलधाऱ्या मंडळींचे सहकार्य व आशीर्वाद मिळतील. पण थोडे आळशी होण्याची शक्यता आहे. तो झटका.
उपाय : सद्गुरुंची आराधना करा.
तुळ
नोकरीत आपल्या कामावर वरिष्ठ खूश होण्याची शक्यता आहे. आपल्या कामामुळे, कामातील कौशल्यामुळे आपला सर्वांवर प्रभाव पडेल. आपला मान वाढण्याचा संभव आहे. त्यामुळे आपली पदोन्नती होण्याचीदेखील शक्यता आहे. आपण जर कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल, तर या आठवड्यात ते काम होण्याची शक्यता आहे.
उपाय : सोमवारी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा.
वृश्चिक
सभा-समारंभात सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून आपल्याला फायदाच होईल. त्यामुळे संधीचा लाभ घ्या. काही भेटवस्तू मिळेल. आपल्या वडील भावंडांच्या, नातेवाईकांच्या मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होतील. समाजात मान सन्मान मिळेल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला उत्तम जाईल.
उपाय : मंगळवारी सुंदरकांडचा पाठ करा.
धनु
परदेशी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे किंवा परदेशाशी संबंधित एखादा व्यवसाय सुरू कराल. एकूण परदेशातून लाभ संभवतो. आईची तीर्थयात्रा घडवून तिचे आशीर्वाद मिळवाल. आईची काळजी घ्याल. थोडेफार अध्यात्माकडे वळण्याचा संभव आहे किंवा त्यातील काही गोष्टींचा अभ्यासही करावासा वाटेल.
उपाय : शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.
मकर
या आठवड्यात आपले मन थोडे अस्वस्थ राहण्याचा संभव आहे. कोणत्या तरी चिंतेने ग्रासेल. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपली चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनावर थोडे नियंत्रण ठेवण्याची गरज भासणार आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरात एखादा पाळीव प्राणी असेल, तर त्याच्याकडे लक्ष द्या.
उपाय : पक्ष्यांना चारा-पाणी द्या.
कुंभ
कुटुंबात असून नसल्यासारखे वाटण्याची शक्यता आहे. काही वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ संभवतो. पण त्यात अति हाव करू नका आणि त्यात आपली इभ्रत घालवू नका. पण आलेली चांगली संधी दवडू नका. देवघेवीचे काही व्यवहार करत असाल तर सांभाळून करा. योग्य त्या फायद्यातोट्याचा विचार करा.
उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.
मीन
या आठवड्यात आपल्या नोकर-चाकरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आपले नुकसान संभवते. धोकादायक मित्रापासूनही सावध रहा. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. पण त्याचे फळ थोड्या विलंबाने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा विरस होईल. पण धीर सोडू नका. फळ नक्की मिळेल.
उपाय : हनुमान चालिसाचा पाठ करा.